Festival Posters
✕

उन्हाळ्यात काळजी घ्या 'लुक'ची

Updated: शुक्रवार, 17 मार्च 2023 (19:17 IST)
 
चेहर्‍याला 'नॅचरल लुक' देण्याचा प्रयत्न करावा. त्वचा डागरहित असेल तर फाउंडेशनचा प्रयोग करू नये. चेहर्‍यावर थोडे लिक्विड मॉइश्चराइझर आणि बेबी पावडर लावल्याने चेहर्‍याला 'ट्रान्सल्युसेंट' लुक मिळेल.
 
रात्रीच्या वेळी पार्टीला जात असाल तर चेहर्‍यावर लिक्विड फाउंडेशन हा सर्वांत चांगला पर्याय आहे. तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीमयुक्त मॉइश्चराइझरचा वापर करायला पाहिजे. फाउंडेशन किंवा ब्लशर हलक्या हाताने लावा. चेहर्‍याचे डाग लपवायचे असतीलल तर फाउंडेशन किंवा पावडर लावायच्या आधी कंसीलर लावायला पाहिजे. कंसीलर एका छोट्याशा ब्रशने लावून वर थोडी पावडर लावावी. नॅचरल लुकसाठी लिपस्टिकच्या जागी लिंप-ग्लास लावावे. रात्री चेहरा आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक लिंप ब्रशच्या मदतीने लावावी. उन्हाळ्यात दिवसा लाइट ब्राउन, रोज, पिंक आणि रात्री ब्रांज, कोरल, कॉपर आणि बरगंडी रंगांच्या लिपस्टिकचा वापर करायला हवा. त्यामुळे चेहर्‍याच्या सौंदर्यात वाढ होईल.
 
डोळ्यांसाठी दिवसा फक्त काजळ लावावे. गरज भासल्यास आय शॅडोसुद्धा लावू शकता. ब्राउन आणि ग्रे आय शॅडो तुमच्या चेहर्‍याला नॅचरल लुक देतात. रात्रीच्या वेळी आय लायनर लावू शकता. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील. रात्रीच्या मेकअपमध्ये आयब्रोजच्या खाली थोडंसं हाय-लाइटर लावावे. यासाठी तुम्ही पांढरा किंवा कोणत्याही लाइट रंगाची शेड वापरू शकता. मस्कारा जरूर लावावा.
 
गालांवर हलक्या ब्लशरचा वापर करावा. पावडर ब्लशरचा वापर करणे सर्वांत सरळ असते. जे नेहमी मेकअप करण्याअगोदर लावायला पाहिजे. ब्लशरला चीक बोन्सवर लावून त्याला बाहेरच्या बाजूने व्यवस्थित करून घ्यावे. चेहर्‍याच्या रंगाशी मेळ खात असलेल्या ब्लशरचा प्रयोग करावा. परफ्यूमसुद्धा मेकअपचा एक भाग आहे. दिवसा कोलोन लावायला पाहिजे. कपड्यात लीफ-ग्रीन, ऑलीव-ग्रीन, लाईम-ग्रीन, लेमन येलो, क्रीम, लाइट ब्राउन, पिंक, टरक्वॉइस ब्ल्यू आणि लाइट ब्ल्यू रंग चांगले वाटतात. फ्लोरल प्रिंट्स, चेक्स, डॉट्स किंवा लेस आणि एम्ब्रॉयडरीचे कपडे पण या दिवसांत छान दिसतात. पण रंगाची निवड करताना थोडी सावधानी बाळगणे जरूरी आहे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

वजन कमी करायचे आहे? आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा; मिळेल फिटनेसचा फायदा

या योगासनाने पोटावरील चरबी कमी होईल, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : माता दुर्गेची कथा

साखरपुड्यासाठी साडी निवडताय? हे पर्याय नक्की पहा! Saree Options Engagement

Paneer Manchurian Recipe लज्जतदार चायनीज पद्धतीची डिश ''पनीर मंचुरियन''

पुढील लेख
Show comments