मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 12 मार्च 2023 (22:25 IST)

Beauty Tips : उन्हाळ्यात सौंदर्य जपेल कूल काकडी

beauty tips
उन्हाळा सुरू झाला की आपण कूल- कूल वस्तूंकडे वळतो. त्यातीलच एक कूल फूड म्हणजे काकडी आरोग्यासाठी तर उत्तम आहेच पण याच्या सेवनाने त्वचा सतेज होते. काकडीत 90 टक्के पाणी आणि दहा टक्क्यांमध्ये व्हिटॅमिन सी, पोषक तत्त्व आणि फॅफीक अॅसिडचा समावेश असतो. पाहू काकडीमुळे कसे फुलतं सौंदर्य:
 
उन्हाळ्यात त्वचेची लाली किंवा जळजळ दूर करायची असल्यास काकडीचा कीस त्वचेवर लावायला हवा. याने खाज सुटणेही थांबतं.
 
त्वचा कोरडी पडत असेल तर काकडीचा रस लावला.  कोरडेपणा दूर होईल.
 
उन्हाळ्यात चिपचिपमुळे कपडे अंगावर घासले जातात. अश्या ठिकाणी काकडीच्या रसात मध मिसळून लेप तयार करा. हे लेप वेदना होत असलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो.
 
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची मात्रा संतुलित राहावी म्हणून काकडीचे सेवन करावे.
 
उन्हाळ्यात फिरल्यामुळे त्वचा काळवंडते. टॅनिग तर होतेच त्वचेचा रंग बदलतो. अशात काकडीच्या रसात लिंबाचा रस मिसळून त्या जागेवर मसाज केल्याने त्वचा उजळ होईल. काकडीच्या रसाने मसाज केल्याने त्वचेची लवचीकता टिकून राहते.
 
काळी वर्तुळ दूर करण्यासाठी त्याजागी काकडीच्या चकत्या ठेवाव्यात.