शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

चेहर्‍यावर घासा टोमॅटो, पहा फरक

कधी-कधी घरात उपलब्ध असणार्‍या साधारण वस्तूदेखील त्वचेवर प्रभाव सोडून जातात. आणि आम्ही उगाच महागड्या क्रीमच्या मागे पळत असतो. येथे आम्ही गोष्ट करत आहोत आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणार्‍या टोमॅटोबद्दल. केवळ अर्धा टोमॅटो वापरून आपल्या चेहर्‍यावर चमक येऊ शकते. टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहर्‍यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल.
आपण टोमॅटो ज्यूसला फेस मास्कच्या रूपात वापरू शकता याने स्किन स्वच्छ होईल. 
 
चेहर्‍यावर पुरळ असतील तर हा फेस मास्क कामास येईल. यासाठी टोमॅटो स्लाइस कापून घ्या. टोमॅटो उकळून त्याच्या सालं आणि बिया काढून वाटून घ्या. हे मिश्रण पूर्ण चेहर्‍यावर लावून घ्या. 1 तासाने चेहरा धुऊन घ्या. या पेस्टमध्ये काकडी किंवा दही मिसळू शकतात.
 
आपल्याकडे वेळ नसल्यास एका वाटीत टोमॅटो रस घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. हे चेहर्‍यावर लावून पाच मिनिट राहून द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.