Daily Horoscope
✕

भारत पेट्रोलियममधील हिस्सेदारी विकण्याची घोषणा

Updated: सोमवार, 9 मार्च 2020 (14:53 IST)
 
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सर्व सरकारी हिस्सेदारी विकण्याची घोषणा केंद्राने केली आहे. केंद्र सरकारने जास्तीत जास्त निर्गुतंवणुकीचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी उद्दिष्ट निर्धारित केले असून यापूर्वीचे कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईस आलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. आता एअर इंडियापाठोपाठ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील संपूर्ण समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.
 
भारत पेट्रोलियमकॉर्पोरेशनमध्ये (बीपीसीएल) सरकारचा 52.98 टक्के हिस्सा आहे. सरकारकडून करण्यात येणारी सर्वात मोठी निर्गुंतवणूक ठरणार आहे. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागाने निविदा जाहीर केली आहे. कंपनीतील सर्व भागभांडवल व कंपनीचे व्यवस्थापकीय नियंत्रणही खासगी उोगांकडे दिले जाणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या भागभांडवलाची किंमत सध्या 114.98 कोटी आहे. युमालीगड रिफायनरी लिमिटेडमध्ये बीपीसीएलचे 61.55 ट्रके भागभांडवल आहे. या बोलीतून केंद्राने त्याला वगळले आहे. नुमालीगड रिफायनरी सरकारी तेल आणि गॅस कंपनीला विकण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

बीपीसीएलची निविदा प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार असून, पहिला टप्पा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट असेल. ज्यात कंपन्या बोलीसाठी निवडल्या जातील, दुसर्‍या टप्प्यात बोली लावली जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही कंपनीला बोलीसाठी निविदा भरता येणार नाही. 10 अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेली खासगी कंपनीच यासाठी पात्र असणार आहे, यासारख्या अटी निविदेमध्ये टाकण्यात आल्या आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

२६५ विमाने नवी मुंबईकडे वळवली जाणार, हा बदल २५ ऑक्टोबरपासून लागू करण्याचा प्रस्ताव

शरद पवार यांनी एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनासंदर्भात सरकारला मोठे आवाहन केले

ठाकरे बंधूंवर टीका करीत फडणवीसांनी 'गझनी' तर आशिष शेलार यांनी 'कोल्हे' म्हटले

RBI Monetary Policy 2026: आरबीआयची मोठी बैठक आजपासून सुरू! तुमच्या गृहकर्जाचे हप्ते वाढणार?

एसआयआर आणि ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत 'विराट गर्जना मोर्चा'; राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले

पुढील लेख
Show comments