suvichar
✕

चांदीच्या भावात 3,500 रुपयांची वाढ

Updated: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (08:20 IST)
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्च महिन्यापासून सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्यामुळे बाजारपेठा बंद असल्याने सुवर्ण बाजारावरही त्याचा परिणाम झाला. तसेच जागतिक पातळीवर उलाढाल थांबून व सट्टेबाजारात गुंतवणूक वाढू लागल्याने सुवर्ण बाजार अस्थिर झाला. हळूहळू अनलॉक होत असताना ग्राहकी वाढू लागली. त्यात आता कोरोना रुग्ण कमी होऊन बाजारपेठेतही खरेदी वाढू लागली आहे. गेल्या महिन्यात सातत्याने कमी होत गेलेल्या सोन्या-चांदीला आता मागणी वाढू लागल्याने त्यांच्या भावात वाढ होत आहे.
 
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चांदीचे भाव वाढत आहे. यामध्ये २९ सप्टेंबर रोजी चांदीच्या भावात एक हजार ८०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर ३० रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून थोडाफार चढ-उतार होऊन सोमवार, १२ आॅक्टोबर रोजी चांदीच्या भावात तीन हजार ५०० रुपयांनी वाढ होऊन ती थेट ६४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात सोमवारी ८०० रुपयांनी वाढून ते ५१ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.
 
अधिकमासामुळे मागणी वाढली
सध्या अधिकमासामुळे राज्यात सोन्या-चांदीला चांगलीच मागणी वाढली आहे. यात सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी खरेदीला अधिकच प्रतिसाद मिळत आहे. माहेरी आलेल्या लेकी-जावयासाठी चांदीच्या वस्तूंसह सोन्याचीही खरेदी होत असल्याने मागणी चांगलीच वाढल्याचे सुखद चित्र आहे. अधिकमासाला आपल्याकडेच महत्त्व असले तरी जागतिक पातळीवरही थांबलेला सुवर्ण बाजार हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने मागणी वाढत असल्याचेही सांगितले जात आहे.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख