शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. ख्रिश्चन
  3. ख्रिसमस
Written By वेबदुनिया|

सांताक्लॉझ आहे तरी कोण!

मुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या गावाचे नाव. सांताक्लॉज गल्लीत त्याचे ऑफिस आहे इथे त्याला रोज भेटता येतं. 

फिनलॅन्डमध्ये डिसेंबरमध्ये 'कामोस' म्हणजे ध्रुवप्रदेशीय रात्रीचा काळ आहे. या दरम्यान सुर्योदय होतच नाही २४ तासांमध्ये फक्त २ तासांसाठी आकाश थोडेसे उजळते आणि पुन्हा रात्रीसारखा अंधार पडतो पण इथे बाराही महिने ख्रिसमसचे वातावरण असते. कारण सांताक्लॉज येथेच रहातो ना. येथे रेनडियर नावाचे प्राणीही आहेत. त्यांची गाडी सांताक्लॉजचे वाहन आहे. सांताचे मदतनीस 'एल्फ' रोज खेळणी पॅक करायचे काम करत असतात. तापमान शून्याखाली -१० ते -२० डिग्री सेल्सियस असले तरी येथे ख्रिसमसची मजा काही आगळीच असते.

या सांताला वर्षभर जगभरातून मुलांची पत्रे येतात. त्यांची संख्या जाते जवळजवळ ७ लाखापर्यंत. तरीही प्रत्येकाला तो उत्तर पाठवतो. ही उत्तरेही 'एल्फ' अक्षरात लिहिलेली असतात आणि 'उत्तर ध्रुव पोस्ट ऑफिसचा' शिक्काही त्यावर असतो. इथे दरवर्षी ४-५ लाख लोक सांताला भेटायला येतात.