रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated :पुणे , शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:54 IST)

अभिनेते 'अजिंक्य देव' यांचा आज वाढदिवस

Ajinkya Deo
मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करीत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट विश्वात त्याने आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. 'रमेश देव' आणि सीमाताई यांचा अजिंक्य पुत्र आहे. अजिंक्य देव यांनी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.
 
अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखनाचित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते 'अजिंक्य देव' यांचा वाढदिवस… जेष्ठ अभिनेते बरोबरच चित्रकलेची आणि अनेक खेळांचीही आवड जोपासणाऱ्या 'अजिंक्य देव' यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अजिंक्य देव यांचा जन्म 3 मे 1963 रोजी झाला.
 
अतिशय हुशार, हरहुन्नरी असे कलाकार… दिमाखदार व्यक्तिमत्व, आवाजातील ठेहराव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 'अर्धांगी' या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
 
मात्र अजिंक्य यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे, 1987 साली आलेल्या 'सर्जा' या मराठी चित्रपटातून अफलातून संवाद, मंत्र मुग्ध करणारी गाणी असे सर्वच काही या चित्रपटात होते. 'सर्जा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता.