शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (20:14 IST)

अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन

Atul Parchure
मराठी सिने सृष्टीतील हुरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी काही वर्षांपूर्वी कर्करोगा सारख्या जीवघेण्या आजारावर मात दिली. ते या आजारातून बाहेर पडले. त्यांनी त्यांनतर कामाला सुरुवात केली. 

दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थता जाणवू लागली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमीमुळे मराठी सिनेजगतात शोककळा पसरली आहे. 
त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. 

त्यांनी काही वर्षांपूर्वी कर्करोगाला लढा देत पुन्हा उभे राहिले आणि कामाला जोमानं सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी त्यांना तब्बेतीच्या तक्रारी जाणवत होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची आज प्राणज्योत मालवली. 

अतुल यांनी नुकतीच सूर्याची पिल्ले नाटकाची घोषणा केली होती. यातून ते पुन्हा प्रेक्षकांच्या समोर येणार होते. 
त्यांनी प्रियतमा, वासूची सासू, तरुण तुर्क म्हातारे अर्क, आम्ही आमचे बाप, जागो मोहन प्यारे, आर के लक्ष्मण की दुनिया, या मालिकेत काम केले. त्यांनी पूल देशपांडे यांची भूमिका व्यक्ती आणि वल्ली नाटकात उत्तम पद्धतीने साकारली. त्यांच्या निधनाने एक हुरहुन्नरी कलाकार गमावला आहे. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. 
Edited By - Priya Dixit