बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2024 (20:54 IST)

शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचा विवाह उद्या

amruta shubhankar
social media
नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक जोडपे लग्नबेडीत अडकणार आहेत. हे जोडपे म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा, अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांचा विवाह उद्या म्हणजेच २१ एप्रिल, २०२४ ला पुण्यात पार पडणार आहे.
 
शुभंकर एकबोटे आणि अमृता बने उद्या सात फेरे घेणार आहे. आज त्यांचे पुण्यात संगीत सेरेमनी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सोशल मीडियावर त्याची झलक पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर आणि अमृताचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या चार महिन्यानंतर ६ एप्रिलला व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला. दोघांच्या कुटुंब व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

Edited by -Ratnadeep Ranshoor