Dharma Sangrah
✕

अभिनेत्याचा वृत्तवाहिन्यांना इशारा

Updated: गुरूवार, 22 जुलै 2021 (10:37 IST)
 
राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात  आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेता ‘उमेश कामत’ देखील सामील असल्याचं समोर आलं होत. त्यावरचं आक्षेप नोंदवत उमेश कामतने बेजबाबदार प्रत्रकारितेला चांगलेच सुनावले आहे.
झाले असे की, या प्रकरणात ‘उमेश कामत’ नावाच्या आरोपीची व्हाट्सअप चॅट समोर आली होती. त्यावेळी काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेता उमेश कामत याचा फोटो वापरला होता. या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या अभिनेता उमेश कामतने याविरोधात कारवाई करण्याचे ठरवले आहे.
 
हा सगळा प्रकार लक्षात येताच अभिनेता उमेश कामतने आपल्या सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला केला आहे. आणि या बेजबाबदार वृत्तवाहिन्यांविरोधी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने लिहिले की, ‘आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी ‘उमेश कामत’ याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे.या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.’
 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिराचे वैशिष्ट्य काय? तीन समुद्रांच्या संगमाजवळील देवीदर्शन

अमिताभ बच्चन यांना चार वर्षे जुन्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

नाना पाटेकर माधुरी दीक्षितच्या शोमध्ये येणार होते, पण आता सोनाली बेंद्रे पहिली पाहुणी असेल

पुढील लेख