Festival Posters
✕

अमृता खानविलकरची लाईफस्टाईल आता यूट्यूबवर

Updated: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (17:01 IST)
 
आपल्या आवडत्या कलाकाराचा दिनक्रम, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या आवडत्या जागा, पदार्थ अशा सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. अमृताने हाच नजराणा आपल्या चाहत्यांसाठी खास आणला आहे. यात अमृताचा सकाळचा दिवस कसा सुरु होतो, स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती काय करते, तिचा डाएट, तिला कशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात, कुठे फिरायला, शॉपिंगला आवडते, आईसोबत ती कसा वेळ घालवते, एकंदर तिचे लाइफस्टाईल, तिच्या आवडीनिवडी, नृत्य, अभिनय अशा तिच्यासंबंधित अनेक गोष्टींचा उलगडा यात होणार आहे. या संदर्भातील पहिला व्हिडिओ तिने शेअर केला असून त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 
 
आपल्या या नवीन उपक्रमाबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ''खरं सांगायचे तर 'अमृतकला'ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रतिसादानंतरच स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरु कारण्यासाठी अधिक प्रेरित झाले. चाहत्यांना नेहमीच त्याच्या आवडत्या कलाकाराच्या लाइफस्टाईलविषयी कुतूहल असते आणि म्हणूनच मी माझ्या चाहत्यांसोबत माझ्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करणार आहे. यात अनेक गोष्टींचा समावेश असेल. हळूहळू ते तुम्हाला कळेलच. सध्यातरी महिन्याला किमान चार -पाच व्हिडिओ शेअर करण्याचा विचार आहे. पुढे बघू कसे जुळून येतेय.''

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

पुढील लेख
Show comments