Marathi Biodata Maker
✕

निर्माते डॉ. लालासाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी

Updated: सोमवार, 4 जून 2018 (13:44 IST)
  
सातारा येथील करंजखोप गावात जन्माला आलेल्या लालासाहेब शिंदे यांनी लहानपणापासून दुष्काळाचा जवळून अनुभव घेतला होता. तेथे आर्थिक कुमक पुरेसी नसल्याकारणामुळे १९७३ साली लालासाहेब यांनी पुण्यात स्थित्यंतर केले होते. तिथे त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कार्यकर्ते म्हणून एक वर्ष काम केले. त्यादरम्यान को ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापनादेखील त्यांनी केली. त्यानंतर विविध कामगारांच्या गरजा समजून घेऊन लालासाहेबांनी १९८३ मध्ये सुप्रीम सर्व्हिसेसची स्थापना केली. याअंतर्गत आज जवळपास १०,००० कामगारांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
 
'बॉईज', 'कॉफी आणि बरंच काही' तसेच 'आजोबा' अश्या सुपरहिट सिनेमांची निर्मिती करून मराठी सिनेसृष्टीतदेखील लालासाहेबांनी आपला यशाचा झेंडा रोवला आहे. तसेच टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा उद्योग, एल वि शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट अशा विविध महत्वाच्या बाजू लालासाहेब यशस्वीपणे सांभाळत आहेत .त्यांच्या अशा प्रयत्नांतून आजवर अनेकांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पाठिंबा मिळाला आहे.पुणे शहरातील आयटी क्षेत्रातील कामगारांसाठी लालासाहेबांनी सिटीझिप,मेट्रोझिप अशा खास सुविधा असलेल्या बस सेवा सुरु केल्या आहेत. गरिबांना,अंधांना मदत करण्यासाठी लालासाहेबांनी आतापर्यंत शिवतेज नागरी पतसंस्था, शिवशक्ती नागरी सहकारी पतपेढी आणि शिवांजली सहकारी पतपेढी या संस्था स्थापन केल्या आहेत. 
 
शासनाची मदत अपुरी पडत असल्यामुळे, आजही अनेक गावे पाण्याविना ओसाड आहेत. त्यामुळे आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत ही उणीव भरून काढणाऱ्या समाजसेवकांची समाजाला मोठी गरज आहे. आज ठीकठिकाणी मोठ्याप्रमाणात श्रमदान होत असून, यांत तरुणांची संख्या मोठी आहे. समाजसेवेसाठी रणशिंग फुंकणाऱ्या अशा सर्व तरुणांसाठी लालासाहेब शिंदे यांचे समाजकार्य बहुमूल्य ठरणारे आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments