ganesh chaturthi

दोन मराठी अभिनेत्यांमध्ये रंगले फेसबुक वॉर

Updated: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:24 IST)
 
अमेय वाघ याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधूनच याचा उलगडा झाला आहे. अमेयने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमेय वाघ आणि सुमित राघवन एकमेकांसमोर उभे राहून पंजा लढवताना दिसत आहे. ‘पडद्यामागे आहे पक्की दोस्ती, तर पडद्यासमोर रंगणार मनोरंजनाची कुस्ती’, असे यावर लिहिले आहे. याला कॅप्शन देताना अमेय वाघ म्हणाला, ‘झी मराठी अवॉर्ड २०२२’ लवकरच तुमच्या भेटीला येतोय. यावेळी दोन मित्रांचं आगळं – वेगळं युद्ध पाहायला मिळणार आहे. तयार व्हा या भन्नाट अनुभवासाठी….” अमेय वाघने शेअर केलेली ही पोस्ट काही सेकंदातच व्हायरल झाली आहे.
 
मात्र, अमेयच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला ट्रोल केले. तुला चांगल्या सोशल मीडिया मॅनेजरची गरज आहे, जो तुला चांगले फंडे देईल, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एकाने राघू मैना…नाही नाही राघू वाघू, अशी कमेंट केली आहे. लोकांना धंद्याला लावून प्रमोशनचे फंडे करतात, अशी कमेंट एकाने केली आहे.
 
अमेय वाघने रविवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी एक पोस्ट शेअर केली. ‘जंगलात राघू (सुमीत राघवन) खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो, याची कृपया नोंद घ्यावी”, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने सुमित राघवनला टॅग केले. अमेयने असे का केले असावे, याने सगळेच बुचकळ्यात पडले. सुमित राघवननेही अमेयच्या या पोस्टवर रिप्लाय केला आहे. “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं दिसतंय. केवळ आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी”, अशी कमेंट सुमितने केली. यात त्याने अमेय वाघलाही टॅग केले. त्यानंतरच त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसले.
 
“वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसते आहे, अशी अशी खोचक पोस्ट अमेय वाघाने त्यावर शेअर केली. त्यात त्याने सुमितला टॅग केले. त्यावर पुन्हा सुमितने उत्तर दिले आहे. “अमेय वाघ घाबरून ठोकलेली आरोळी असते, डरकाळी नव्हे आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे.” “प्रकरण कितीही गंभीर असलं तरी मी तेवढाच खंबीर आहे”, असे म्हणते अमेयने सुमितला प्रत्युत्तर दिले.

Edited By - Ratandeep Ranshoor 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

सलमान खानचा अंगरक्षक शेराचा मुलगा अबीर सिंग 'टार्झन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

'रामायण'मधील पहिले गाणे 'जय जय राम' प्रदर्शित, साई पल्लवी-रणबीर कपूरच्या 'सिया राम' लूकने प्रेक्षकांची मने जिंकली

'हनुमान अंश'नंतर विशाल चतुर्वेदीने 'राम बोला' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गणेश चतुर्थीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी केले बाप्पाचे स्वागत

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील पहिले गाणे 'जय जय राम' गणेश चतुर्थीला प्रदर्शित

पुढील लेख
Show comments