मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (16:03 IST)

मराठी चित्रपट चालणार कसे? - हेमंत ढोमे

hemant dhome
तिकीट बुकिंग घेऊन शो परस्पर रद्द
 
मराठी चित्रपट चालत नाही, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. प्रेक्षक येऊनही जर शो रद्द होत असेल, तर हे चुकीचे आहे. असाच प्रकार घडला आहे, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याचे अनेकांकडून कौतुक होत असतानाच कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग घेऊन, शो रद्द झाल्याचे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. याबाबत प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेंशी संपर्क साधला. हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी ‘सनी’चे शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत.
hemant dhome
याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंन ढोमे यांनी नाराजी व्यक्त केली. हेमंत ढोमे म्हणतात, ‘’ थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे? एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे?’’
Published By -Smita Joshi