Festival Posters

सुभेदारांच्या घरातली ‘लगीनघाई’

Updated: गुरूवार, 13 जुलै 2023 (21:50 IST)
 
आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी  मालुसरे ! स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अनमोल देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला. 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबाने ही  तितकीच मोलाची साथ दिली. हा भावनिक पदर ही ‘सुभेदार’ चित्रपटात पहायला मिळणार असून आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या समस्त मालुसरे कुटुंबीयांच आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटातील एक देखणं पोस्टर नुकतंच  प्रदर्शित झालं  आहे.  
 
यात मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. त्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसतायेत. यातील सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर तर त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे.
 
सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे तर मालुसरे कुटुंबीयांचा आधारवड असणाऱ्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसतायेत. तान्हाजीरावांच्या आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख तर मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर आहे.      
 
ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना तात्काळ २ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले

अभिनेत्री भाग्यश्री यांच्या आरतीनंतर सांगलीच्या राजघराण्यात नवा वाद! वडिलांनी केला गंभीर आरोप!

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी 'गणेश डस्ट टू स्टारडस्ट' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गायकाने परदेशी लोकांची मने जिंकली, वेंबली स्टेडियममध्ये टेलर स्विफ्टचा विक्रम मोडला

ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर

पुढील लेख
Show comments