ganesh chaturthi
✕

'तोडफोड' मुग्धा कऱ्हाडे

Updated: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (14:31 IST)
मुग्धाने अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'एक तारा' या चित्रपटातील 'विसर तू' गाण्याद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते, विशेष म्हणजे या गाण्यासाठी तिला मिरची अवॉर्ड्सने गौरविण्यातदेखील आले. त्यानंतर मुग्धाने  'तेरे बिन मरजावा' आणि 'मंत्र' या चित्रपटामध्ये पार्श्वगायिका म्हणून काम केले आहे.
 
मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेली मुग्धा सध्या एल अँड टी कंपनीमध्ये कार्यरत आहे.तिचे हे क्षेत्र गायनापासून अगदीच वेगळं असलं तरी अगदी लहानपणापासूनच मुग्धा गायनाचं प्रशिक्षण घेत होती.

त्यानंतर, सुरेश वाडकर यांच्या 'आजिवासन' या नामांकित स्टुडिओमधून साऊंड इंजिनियरिंगचे प्रशिक्षदेखील घेतले. शिवाय याच स्टुडिओत काही काळ नोकरी करत तिने संगीताची आपली आवड कायम झोपासली. अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे हि मावस भावंडे असल्याकारणामुले ते दोघंही बालपणापासून एकत्र गाण्याचा रियाज करत असत. या जोडगोळीने अनेक लाईव्ह शोज तसेच गायनाचे बैठकी कार्यक्रमदेखील केले आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये ही कलाकार जोडी गेल्या साडेतीन वर्षांपासून एकत्र काम करत आहेत.
 
इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा 'बॉईज २' हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे विशाल देवरुखकर याने दिग्दर्शन केले असून, ऋषिकेश कोळीने संवादलेखन केले आहे. 'बॉईज २' चे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्माते असून, इरॉस इंटरनेशनलद्वारे या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माधुरी दीक्षित आणि सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच एकत्र; ‘कोण होणार करोडपती’च्या शुभारंभात उलगडणार खास किस्से

३९ वर्षांनंतर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया 'नोटिस' या चित्रपटात एकत्र दिसणार

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

शाहरुख खानला तुरुंगात जाण्याची वेळ आली, तेव्हा नाना पाटेकर यांनी केली होती मदत; जुना किस्सा पुन्हा चर्चेत!

हिवाळ्यात तुम्ही दक्षिण भारताला भेट देत असाल, तर हे साहसी उपक्रम नक्की करून पहा

पुढील लेख
Show comments