शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (08:42 IST)

विक्रम गोखले यांच्या निधनाचं वृत्त खोटं”; पत्नी वृषाली यांनी दिली प्रकृतीविषयीची माहिती

vikram gokhale
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप कॉम्पलिकेशन्स आहेत. त्यांच्याकडून म्हणवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत. तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफवांवर कोणी ही विश्वास ठेऊ नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, असं दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात रात्रीपासूनच उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी गोखले व्हेंटीलेटरवर असल्याचं स्पष्ट केलं. “काल सायंकाळी ते कोमामध्ये गेले. त्यानंतर ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, ते प्रतिसाद देत आहेत की नाही यासंदर्भात डॉक्टर सकाळी निर्णय घेतील,” असं विक्रम गोखेलेंच्या पत्नी ऋषाली यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं आहे. सरकारी ट्विटर हॅण्डलपासून अजय देवगण, जावेद जाफरी यासारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशीरा विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण करणारी ट्विट केल्याने गोखलेंच्या मृत्यूसंदर्भातील संभ्रम निर्माण झाला होता. याचसंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.
 
गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केल्याने विक्रम गोखले हे सोशल मीडियावर चर्चेत आले.


Edited By- Ratnadeep Ranshoor