Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजेश,भूषण यांचा आक्रमक 'शिमगा'

Updated: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (11:32 IST)
 
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान आक्रमक भावमुद्रेत दिसत असून त्यांच्या मागे आगीच्या ज्वाळा आणि त्यात पेटत असणारे घर दिसत आहे. आता या ज्वाळा शिमगा संबंधित आहेत  की अजून दुसरे काही कारण आहे हे चिञपट पाहिल्यावरच समजेल पण या चित्रपटात 'शिमगा' या सणासोबत अजून वेगळे काहीतरी आणि मनोरंजनात्मक असणार हे नक्की.
 
'शिमगा' हा चित्रपट श्री केळमाई भवानी प्रॉडक्शनची निर्मित आहे. मूळचे कोकणाचे असणारे निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्यासह विजय आंदळकर, सुकन्या सुर्वे आणि नवोदित अभिनेत्री  मानसी पंड्या यांच्या भूमिका आहेत. तर पंकज पडघन यांची सुमधुर गीते आहेत. गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते यात असणार आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. होळीच्या म्हणजेच शिमग्याचा मुहूर्त गाठत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

"माझं तारुण्य अन् बेडरूमचे स्वप्न पाहणं बंद करा"; बाबा रामदेव यांच्या टीकेला कंगनाचे सडेतोड उत्तर!

मराठी लोकप्रिय 'जोडी' प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर पुन्हा एकत्र

मनोज बाजपेयी महात्मा गांधींची भूमिका साकारणार; सुधीर मिश्राच्या 'महात्मा गांधी अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात अज्ञात अध्याय पाहायला मिळणार

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात गेली; जाणून घ्या कारण

Bhimashankar Jyotirlinga भगवान शिवाच्या घामातून उगम पावलेल्या भीमा नदी तीरावर स्थापित जागृत भीमाशंकर ज्योतिर्लिंग

पुढील लेख
Show comments