शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (22:55 IST)

बिचुकले म्हणतो, म्हणून शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे

Abhijit Bichukale
बिगबॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकलेने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूकबाबत  विधान केलं आहे. “शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे. कारण मी बिगबॉसमध्ये असताना शाहरुख खान बिगबॉस पाहत होता,” असा दावा अभिजीत बिचुकलेने केला. तो  साताऱ्यात माध्यमांशी बोलत होता.
 
अभिजित बिचुकले म्हणाला, “कोणीतरी ट्वीट केलं आणि ती बातमी प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यात म्हटलं आहे की शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल होती. १९९१ मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी स्टाईल आणली गेली ती माझी.”
 
“मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. सिझन नंबर १५ मध्ये मी काय करिष्मा केला, ‘मैंने क्या गुल खिलाए’ हे शाहरूखनेही पाहिलं आहे. लोकांनीही ते पाहिलं आहे. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी,” असं मत अभिजीत बिचुकलेने व्यक्त केलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor