मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (09:37 IST)

Sunil Holkar Passed Away: तारक मेहता फेम अभिनेता सुनील होळकर यांचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन

Sunil Holkar Passed Away
तारक मेहता का उल्टा चष्मा तसेच अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सुनील होळकर यांचे निधन झाले आहे. ते 40 वर्षांचे होते. त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. 'गोष्ट एक पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते.
सुनील होळकर हे काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिसने ग्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी निधनापूर्वी त्यांचा शेवटचा मेसेज आपल्या मित्राला व्हाट्सअप स्टेट्सवर शेअर करायला सांगितले. त्यांनी लिहिले की ही त्यांची शेवटची पोस्ट आहे. सर्वांना निरोप देण्यापूर्वी मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. माझ्याकडून काही चुकले असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. माझे हे मेसेज माझा मित्र माझ्यावतीने पोस्ट करत आहे. 

सुनील यांनी अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत बरीच वर्षे काम केलं. अभिनेता, निवेदन अशी त्यांची ओळख होती. गोष्ट एका पैठणीची, मोरया या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची अमीट छाप सोडली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळतातच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. 

Edited By - Priya Dixit