suvichar
✕

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

Updated: सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 (18:56 IST)
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुन्हा एकदा जय शाह यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. हा त्यांचा सलग दुसरा कार्यकाळ असेल. बाली येथील बैठकीत, सर्व संचालकांनी एकमताने त्यांचे नाव सुचवले आणि इतर कोणीही उमेदवार नसल्यामुळे, त्यांची बिनविरोध पुनर्निवड झाली.
 
अध्यक्षपदी जय शाह यांच्या पुनर्निवडीची घोषणा करताना, आयसीसीने आपल्या अधिकृत हँडलवर लिहिले: "आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद मंडळाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, बाली येथे झालेल्या मंडळ आणि समितीच्या बैठकीत सर्व संचालकांच्या प्रस्तावानुसार, जय शाह यांची आयसीसी अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा बिनविरोध पुनर्निवड झाली आहे. हा निर्णय त्यांच्या नेतृत्वावरील मंडळाचा विश्वास दर्शवतो." क्रिकेटसाठी या महत्त्वपूर्ण वेळी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यामुळे या खेळाला जागतिक स्तरावर विस्तारण्यास, चाहता वर्ग वाढवण्यास आणि भविष्यातील योजनांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्यास मदत होईल.
 
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले की, या पदावर काम करणे ही अभिमानाची आणि मोठी जबाबदारी आहे. ते जगभरात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व सदस्यांसोबत मिळून काम करतील. त्यांनी स्पष्ट केले की, क्रिकेट सध्या एका अत्यंत रोमांचक टप्प्यातून जात आहे आणि २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची एक मोठी संधी आहे.  
ALSO READ: टीम इंडिया पुढच्या महिन्यात एकदिवसीय मालिका खेळणार; रोहित आणि विराट सुद्धा दिसणार!
जय शाह २०२४ मध्ये पहिल्यांदा आयसीसीचे अध्यक्ष झाले. त्यांनी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची जागा घेतली आणि वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी हे पद भूषवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले. जय शाह हे आयसीसीचे प्रमुखपद भूषवणारे पाचवे भारतीय आहे.  
ALSO READ: ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी निवड; २०२८ ऑलिम्पिकवर राहणार विशेष लक्ष

टीम इंडिया पुढच्या महिन्यात एकदिवसीय मालिका खेळणार; रोहित आणि विराट सुद्धा दिसणार!

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका कधी सुरू होणार? संपूर्ण वेळापत्रक पहा

अंडर-१९ आशिया चषकावर भारताची मोहोर; अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

पुढील लेख
Show comments