2024 च्या टी-२० विश्वचषकानंतर स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. निवृत्तीची घोषणा करताना त्याने सांगितले की तो कसोटी, एकदिवसीय आणि देशांतर्गत टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. याचा अर्थ तो आयपीएलमध्येही खेळताना दिसेल. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचेही स्टार्कने सांगितले
स्टार्कने 2012 मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याआधी तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला होता. स्टार्कने 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्याने 23.81 च्या सरासरीने 79 विकेट्स घेतल्या. तो टी-20 स्वरूपात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Edited By - Priya Dixit