Shikhar Dhawan:शिखर धवनने आयपीएलमध्ये एक खास विक्रम केला

Last Modified बुधवार, 25 मे 2022 (09:52 IST)
आयपीएल 2022 च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. यासह या स्पर्धेतील दोघांचा प्रवास संपुष्टात आला. हे दोन्ही संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व नव्हते, पण पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनने तो आपल्यासाठी खास करून घेतला. या सामन्यात धवनने आयपीएलचे 700 चौकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत धवनच्या खालोखाल विराट कोहली आहे, ज्याने 576 चौकार मारले आहेत. त्याचबरोबर या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 561 चौकार मारले आहेत.

धवनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 32 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन षटकार आणि दोन चौकार आले. शिखर धवनने आपल्या डावातील पहिले चार चौकार मारताच एक खास विक्रम केला. आयपीएलमध्ये 700 चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला.त्याच्या नावावर दोन शतके आणि 47 अर्धशतके आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटने 701 चौकार आणि 136 षटकार मारले आहेत.
शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने 6592 धावा केल्या आहेत, तर धवनने 6244 धावा केल्या आहेत. या दोन फलंदाजांशिवाय तिसऱ्या कोणत्याही फलंदाजाने आयपीएलमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठलेला नाही.यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Kieron Pollard Record: वेस्ट इंडिजचा खेळाडू किरॉन पोलार्ड ...

Kieron Pollard Record: वेस्ट इंडिजचा खेळाडू किरॉन पोलार्ड  600 T20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला
Kieron Pollard Record : वेस्ट इंडिजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड 600 T20 सामने ...

रिलायन्स इंडस्ट्रीजने 'MI Emirates'आणि 'MI Cape Town'चे ...

रिलायन्स इंडस्ट्रीजने 'MI Emirates'आणि 'MI Cape Town'चे केले अनावरण
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड , मुंबई इंडियन्सच्या मालकांनी आज मुंबई इंडियन्स #OneFamily ...

IND vs PAK Asia Cup: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्या ...

IND vs PAK Asia Cup: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्या संदर्भात प्रसिद्ध प्रोमो व्हिडिओ मध्ये रोहित आणि बाबर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप टी-20 सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत ...

Asia Cup 2022 : हा फलंदाज रोहित शर्मा सोबत ओपनिंग करणार, ...

Asia Cup 2022 : हा फलंदाज रोहित शर्मा सोबत ओपनिंग करणार, अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11 जाणून घ्या
27 ऑगस्टपासून आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याचवेळी 28 ऑगस्ट ...

Asia Cup:टीम इंडिया घोषित, कोहलीचे पुनरागमन, बुमराहच्या ...

Asia Cup:टीम इंडिया घोषित, कोहलीचे पुनरागमन, बुमराहच्या जागी हा गोलंदाज आला
आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताने या बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी 15 ...