शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2022 (07:41 IST)

महिला नाशिक प्रिमियर लीग स्पर्धेचा थरार उद्यापासून

महिला क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी. श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्त रीत्या १९ ते २१ मे महिला नाशिक प्रिमियर क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करीत आहेत.या “ नाशिक प्रिमियर लीग २०२२ “ स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटिल यांचे शुभहस्ते १९ मे रोजी सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे होणार आहे.
 
सदर “ नाशिक प्रिमियर लीग २०२२ “ या टी-२० स्पर्धेत सहभागी एकूण सहा संघांमध्ये ९ सामने होणार असून , राज्य पातळीवर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या नाशिकच्या अनेक महिला खेळाडूंचा समावेश असणार आहे. मात्र माया सोनवणे महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेच्या शिबिरासाठी व ईश्वरी सावकार नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी गेल्या मुळे सदर स्पर्धेसाठी उपलब्ध नसतील . रसिका शिंदे, लक्ष्मी यादव , साक्षी कानडी या व इतर महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत. २१ मे ला या महिला नाशिक प्रिमियर लीग २०२२ स्पर्धेचा समारोप होईल.
 
या महिला नाशिक प्रिमियर लीग २०२२ स्पर्धेत सहभागी होणारे सहा संघ, त्यांचे कर्णधार व प्रशिक्षक अनुक्रमे पुढीलप्रमाणे :१- नाशिक स्टार्स – पुजा छाजेड कर्णधार , प्रशिक्षक – मोहनिश मुळे२- नाशिक सुपर किंग्स – तेजस्विनी बाटवाल, शांताराम मेणे३- नाशिक ब्लास्टर्स – साक्षी कानडी , मंगेश शिरसाट४- नाशिक वॉरीअर्स – श्रद्धा कुलकर्णी , विभास वाघ५- नाशिक फायटर्स – रसिका शिंदे , भावना गवळी६- नाशिक चॅम्प्स – प्रिया सिंग , वैभव नाकील
 
नाशिक प्रिमियर लीग २०२२ स्पर्धेची व्यवस्थापन समिती१- रतन कुयटे२- संदीप सेनभक्त३- भाविक मंकोडी