शर्विन उदय किसवे यांची १९ वर्षांखालील वयोगटात बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड
नाशिकच्या शर्विन उदय किसवे यांची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. ९ मे ते २ जून दरम्यान माजी कसोटीपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरूतर्फे भारतभरातील उदयोन्मुख, होतकरू खेळाडूंसाठी हे शिबिर होणार आहे. डावखुरा सलामीवीर शर्विन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिकादेखील निभावतो.
१४ वर्षे वयोगटापासूनच शर्विनने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शर्विन सध्या कच बिहार करंडक स्पर्धेत कोलकता येथे बाद फेरीतील सामने खेळत आहे.त्याच्या या निवडीने सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शर्वीन हा प्रशासकीय अधिकारी उदय किसवे यांचा मुलगा असून त्याच्या या निवडीचे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे. किसवे कुटुंब मुळ मनमाडचे असल्यामुळे मनमाडकरांनी या निवडीनंतर त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. त्याच्या या वाटचालीस इंडिया दर्पण परिवारातर्फे शुभेच्छा.