रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 एप्रिल 2022 (21:55 IST)

BCCI महिला टी20 क्रिकेट स्पर्धा: नाशिकच्यामाया सोनवणेची प्रभावी गोलंदाजी; आंध्र पाठोपाठ केरळ विरुद्ध ही 4 बळी

bcci
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणे ने पुदुचेरी येथे आंध्र पाठोपाठ केरळ विरुद्ध ही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकी ने सामना गाजवला. आज दुसर्‍या सामन्यात केरळ विरुद्ध माया ने चार षटकात केवळ 12 धावा देत 4 बळी घेतले. यात 12 निर्धाव चेडुंचा समावेश होता.
 
सर्वाधिक 30 धावा करणार्‍या केरळची कर्णधार एस सजनाला त्रिफळाचीत करून मायाने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरविला . या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळ ला 90 धावात रोखले. शिवाय 5 बाद 65 या स्थितित, सातव्या क्रमांकावर फलंदाजी ला येऊन नाबाद 5 धावा करताना महाराष्ट्राला 18 व्या षटकात, दोन गडी राखून विजयी करण्यात माया सोनवणे ने मोलाचा हातभार लावला.
 
याआधी पहिल्या सामन्यात देखील काल आंध्र विरुद्ध अतिशय प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते . माया ने चार षटकात 32 धावात 4 बळी घेतले. यात 9 निर्धाव चेडुंचा समावेश होता. आंध्र च्या 73 धावांच्या सलामीनंतर माया ने दोन्ही फलंदाजांना त्याच धावसंख्येवर तंबूत पाठविले. त्यामुळे आंध्र ला 136 धावात रोखण्यात महाराष्ट्राला यश आले.
 
पण आंध्र ने महाराष्ट्राला 9 बाद 95 असे रोखल्यामुळे वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला. वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – 21 एप्रिल मेघालय  22 एप्रिल हैद्राबाद व 24 एप्रिल राजस्थान विरुद्ध.