1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By अभिनय कुलकर्णी|

समलैंगिकतेची कारणे

PRPR
पुरूष समलिंगीला इंग्रजीत गे (Gay) आणि महिला समलिंगींना लेस्बियन (lesbian) असे म्हणतात. समलैंगिकता अगदी प्राचीन काळापासून सर्व देशांत आहे. पण आत्ता खुलेपणाने ती जितकी समोर येतेय तेवढी ती कधीच नव्हती. आता तर अनेक देशांनी त्याला कायदेशीर मान्यता दिली आहे. काही देश मात्र याच्या कठोर विरोधात आहेत.

जगभर समलैंगिकता आता वाढत चालली आहे. पण समलैंगिकता हा रोग आहे. ते निसर्गाच्या विरूद्ध आहे. हॉलीवूड- बॉलीवूडचे चित्रपट आता खुलेपणाने समलैंगिक प्रसंग दाखवून त्याला उत्तेजन देत आहेत. पण समलैंगिकतेचे मूळ कुठे आहे ते शोधणे गरजेचे आहे.

PTIPTI
समलैंगिकतेची कारणे अद्यापही पुढे आलेली नाही. पण शास्त्रज्ञांच्या मते आनुवांशिक आणि जन्माच्या आधी झालेल्या हार्मोनल बदलामुळे समलैंगिकता जन्म घेते. काही डॉक्टर त्याला मानसिक रोग मानतात. काहींच्या मते हे चुकीचे आहे. समलैंगिकता केवळ मनुष्यप्राण्यात आढळते असेही नाही. इतर प्राण्यांमध्येही ती दिसून येते. पेंग्विन, चिंपाझी, डॉल्फिनही समलैंगिक असू शकतता. पण हे सगळे नैसर्गिक त्रुटीमुळे किंवा मानसिक विकारामुळे असे होतात, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

समलैंगिकतेविषयी इतरही काही मते आहेत. उदा. स्त्री व पुरूषांना त्या त्या वेळी योग्य प्रेम मिळाले नाही की मग ते चुकीचा रस्ता पकडतात. एकदा का या रस्त्यावर चालण्याची सवय झाली की मग त्यांना योग्य रस्ताही आवडत नाही.

ओशोंचे म्हणणे तर याही पुढचे आहे. पुरूष वा स्त्रीला परस्परांपासून प्रेम मिळाले नाही, की ते संभोगालाच प्रेम समजतात. एखादी बायको पतीवर प्रेम करत नसल्यास तिचा पती संभोगात्सुक असतो. मात्र ती स्त्री दुसरी असावी असे त्याला वाटते. हे उलटही असू शकते.

PRPR
दुसरीकडे प्रत्येक व्यक्ती बायोसेक्स्शुअल असते, असे ओशोंचे म्हणणे आहे. कोणते तत्व कुणात जास्त आहे, यावर त्याचा प्रभाव अवलंबून आहे. एखाद्या पुरूषात साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रैण मन असेल तर तो पुरूष असूनही उपयोग नाही. हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीतही लागू होते. असा कोणताच पुरूष नसतो, ज्यात स्त्रैण गुण नाही. त्याचवेळी अशी कोणतीच स्त्री शंभर टक्के स्त्री नसते.

व्याभिचाराची कारणे- आपल्या जोडीदाराचा विश्वासघात करण्याची अनेक कारणे असू शकतात. आई झाल्यानंतर स्त्रिया पूर्ण मुलांवर केंद्रित होतात. अशा वेळी आपली बायको आपल्यावर प्रेम करत नाही, अशी पुरूषांची भावना होते. त्यामुळे तो दुसर्‍या स्त्रीविषयी प्रेम बाळगतो.

२८ ते ३७ वयादरम्यानच्या स्त्रियांमध्ये सेक्सविषयी खूप आकर्षण असते. अशावेळी त्यांची कामेच्छा पती पूर्ण न करू शकल्यास स्त्रिया दुसरा कोणी जोडीदार गाठतात. पुरूष जोडीदार न मिळाल्यास त्या अन्य कुठल्या तरी स्त्रीशी संग करायलाही घाबरत नाहीत.

अन्य काही कारणे- साधारणपणे मनोरोगतज्ज्ञ पुरूष व स्त्री समलैंगिकतेची इतरही काही कारणे सांगतात.

समलैंगिक पुरूष
१. लहानपणापासूनच महिलांसह राहिलेले पुरूष, ज्यांना आई वा अन्य स्त्रीनेच वाढविले आहे. त्यामुळे त्यांची मानसिक रचना बदलून ते स्त्रैण होतात.
२. सेक्स हार्मोनमध्ये झालेल्या बदलामुळेही पुरूष समलैंगिक होऊ शकतात.
३. बायकोनेच पतीला दूर ठेवले असेल तर.
४. लहानपणात झालेली चुक सवय म्हणून स्वीकारली गेली असेल तर.
५. लहानपणापासूनच झालेली मैत्री अशा संबंधात परिवर्तित होते.

समलैंगिक स्त्रीः
१. लहानपणापासूनच पुरूषी पद्धतीने मुलीला वाढविले जाते. तिला मुलीऐवजी मुलगा म्हणणे. मुलींपेक्षा मुलांमध्येच अधिक रहाणे. यामुळे स्त्रैण गुण बदलून पुरूषांसारखेच वर्तन सुरू होते.
२. सेक्स हार्मोनमध्ये परिवर्तन.
३. पतीकडून कामेच्छा पूर्ण न झाल्यास.
४. लहानपणात झालेली चुक सवय म्हणून स्वीकारली गेली असेल तर.
५. लहानपणापासूनच झालेली मैत्री अशा संबंधात परिवर्तित होते.

अनैसर्गिक गोष्टीची आताशा आपल्याला सवय झाली आहे. निसर्गाच्या रचनेत बदल करून वेगळे काही करण्याकडे कल वाढला आहे. म्हणूनच झाडे, भाज्या, फुले, प्राणी, पक्षी हे सगळे हायब्रीड करण्याचे प्रयोग वेगात होत आहेत. समलैंगिकता हा याचाच एक प्रकार आहे. निसर्गाशी आपण खेळत आहोत. समलैंगिकता नैसर्गिक नाही. ती कृत्रिम आहे. म्हणूनच हानीकारक आहे. तो एक रोग आहे. त्याचा उपचार करणेही गरजेचे आहे. त्याचा प्रसारही रोखायला हवा. अन्यथा, समाजात हा रोग पसरल्यास त्याचे भयावह दुष्परिणाम होतील.