Dharma Sangrah

अटल बिहारी बाजपेयी: राजकारणातील 'अजातशत्रू' यांचा महान प्रवास...

गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (21:10 IST)
38 वर्षांपूर्वी 1 डिसेंबर 1980 साली भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात भाषणाच्या शेवटी अटलबिहारी बाजपेयी यांनी गर्जना केली की मी पश्चिमेकडील घाटाच्या जवळ असणाऱ्या समुद्राच्या काठावर उभे राहून असे भाकीत करण्याची हिंमत करत आहे की काळोखातून सूर्य निघेल आणि कमळ उमलेल'... आज भारतात तब्बल 19 राज्यात कमळ उमगलेले आहे. पण या भारताचा अटलरूपी सूर्य मावळला आहे.     
 
माजी पंतप्रधान "भारतरत्न" अटलबिहारी बाजपेयी आता आपल्या सोबत नाही. राजकारणात 2 जागांपासून ते 282 जागांवरच्या भाजप पक्षाचे रथ चालवणारे अर्थात उत्तमरीत्या नेतृत्व करणारे अटल बिहारी बाजपेयी यांचे महाप्रयाण झाले.
 
वयाच्या 93व्या वर्षी यांनी एम्स मध्ये अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी बाजपेयी हे फक्त भारताचे माजी पंतप्रधान नसून एक साधे, लोकप्रिय राजकारणी, उत्तम कवी, आणि महान साहित्यकार होते. राजकारणातही सामाजिक विषयांचे सखोल विचार करत होते. कदाचित या सर्व गुणांमुळेच लोकांच्या मनात स्वतःची जागा बनवली.
   
प्रभावशाली वक्ता:- भारतीय राजकारणात अटलजी नेहरूजींसारखे अद्वितीय राजकारणी होते. भविष्याचे भाकीत करत नेहरूजी अटलजींचे भाषण ऐकताना म्हणाले होते की मी "भविष्यातील पंत प्रधान" यांचे भाषण ऐकत आहे.
 
स्पष्टवादी व्यक्तिमत्त्व :- 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर 'इंदिरा गांधी' यांना 'दुर्गा' म्हणून संबोधले होते. अटलजींना राजकारणातील अजातशत्रू म्हणायचे. अटलजींनी हे जाहीरपणे स्वीकारले होते की  'मी फक्त अविवाहित आहे ब्रह्मचारी' नाही. 
 
अनोखा विरोध :- 1971 मध्ये तेल संकटावरून इंदिरा गांधी सरकारने तेलाच्या किमतीत 80 टक्क्याने वाढ केली होती. आणि त्या लोकांना पेट्रोल वाचवा असे संदेश देण्यासाठी बग्गीने फिरत असताना याचा जाहीरपणे विरोध करण्यासाठी जन संघाचे नेते अटलजीं बैलगाडीतून संसद भवन पर्यंत गेले. 
 
शांती-प्रिय:- काश्मिरी, जमहुरियत आणि मानवते बद्दल बोलणाऱ्या अटलजींवर काश्मिरी लोकांचा 'अटळ' विश्वास होता. शांती प्रिय अटलजींनी राजस्थानच्या पोखरणमध्ये परमाणू चाचणी करविण्याचे धाडस केले. रुसलेल्या पाकिस्तानला मनवणार्‍या आणि कारवा-ए अमन (शांतीचा) संदेश देणाऱ्या या शांती प्रिय भारताचे पंतप्रधानांना प्रत्युत्तरात 'कारगिल चे युद्ध' मिळाले. 
 
राजकारणातील भीष्म पितामह':- एका मुलाखतीत आपल्या एकाकीपणा बाबत सांगणारे बाजपेयी यांनी 2005 मध्ये राजकारणातून निवृत्ती घेतली. त्या वेळी राज्यसभेला संबोधित करताना तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांनी अटलबिहारी बाजपेयीजींना 'राजकारणातील भीष्म पितामह' म्हटले होते.
     
भारतीय राजकारणातील एक आदर्श नेता आता आपल्या बरोबर नाही. भाजप पक्षाला एका वटवृक्ष प्रमाणे सावली देणाऱ्या मोठ्या राजकारणी युगाचा अंत झाला......त्यांचाच शब्दात..त्यांच्यासाठी 
श्रद्धांजली ...
 
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
”अंतरतम का नेह निचोड़ें
बुझी हुई बाती सुलगाएँ।”
”आओ फिर से दिया जलाएँ”
हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
”वतर्मान के मोहजाल में
आने वाला कल न भुलाएँ।”
”आओ फिर से दिया जलाएँ।”
आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
”अंतिम जय का वज़्र बनाने
नव दधीचि हड्डियां गलाएँ।”
”आओ फिर से दिया जलाएँ”

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

फक्त २ आठवड्यांत निर्दोष गोरेपणा मिळवा... फसवणूक करणारे आता अडचणीत येणार!

अमेरिका-इराण कराराचा परिणाम: कच्चे तेल स्वस्त होणार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

LIVE: झटपट गोरेपणा मिळवा, आता फसवणूक करणारे अडचणीत येणार! FDA ची सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई

भारताविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळालेला हा फलंदाज केन विल्यमसनची जागा घेईल

मध्य पूर्वेतील युद्ध संपुष्टात येईल, ट्रम्प यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अमेरिका-इराण यांच्यातील ऐतिहासिक कराराची घोषणा

पुढील लेख
Show comments