Biodata Maker marathi
✕

बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा अशी होती परंपरा वाचा सविस्तर

Updated: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (11:51 IST)
 
त्यावेळच्या दसरा मेळाव्याचा स्वरुप आतासारखे नव्हते. शिवसेनेच्या जन्मानंतर पक्ष विस्ताराच्यादृष्टीने घेतल्या जाणाऱ्या बैठकांचा तो एक भाग होता. या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत अनेक ठिकाणी बैठक घेतल्या होत्या. यादरम्याना बाळासाहेबांनी अनेक चाळी आणि व्यायामशाळांना भेटी दिल्या.

चाळीतील अगदी लहान खोल्यांमध्येही बाळासाहेब ठाकरे बैठका घेत असत. फक्त 10 ते 20 लोक असले तरी बाळासाहेब त्यांच्यासमोर बोलायचे. या जनसंपर्कामुळेच त्यावेळी दादरची हिंदमाता आणि परळ येथील भारतमाता व्यायामशाळेतील तरुणांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी स्वत: ला झोकून दिले होते.

शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला कोणतीही पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. त्यावेळी गिरगाव व्यायामशाळेतील तरुणांनी या मेळाव्याला सुरक्षाव्यवस्था पुरवली होती. वेगवेगळ्या ठिकाणच्या याच व्यायामशाळा पुढे जाऊन शिवसेनेच्या शाखांच्या निर्मितीचे कारण ठरल्या, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
 
 
स्टीलच्या डब्ब्यातून जमवले होते पैसे
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी गर्दीत एक स्टीलचा डब्बा फिरवण्यात आला होता. त्यावेळी दसरा मेळाव्याला आलेल्या लोकांनी या डब्ब्यात आपापल्या परीने शिवसेनेसाठी वर्गणी दिली होती. याच दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ त्यावेळी व्हीजेटीआय महाविद्यालयात शिकत होते. जेव्हा छगन भुजबळांना दसरा मेळाव्याची माहिती मिळाली तेव्हाच त्यांनी शिवाजी पार्कला जायचे ठरवले. मी शिवाजी पार्कात गेलो तेव्हा त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. एवढा मोठा जनसमुदाय मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
 
शिवसेना राजकारणापासून दूर राहणार
प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे, रामराव आदिक अशा अनेक ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीत पहिल्या मेळाव्यात बाळासाहेब सभेपुढे बोलायला उभे राहिले.
या व्यासपीठावर प्रबोधनकार ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत रामराव आदिक, बळवंत मंत्री आणि प्रा. स. अ. रानडे हे देखील उपस्थित होते.
‘महाराष्ट्राला आज खरी गरज महाराष्ट्रवादाची आहे’, असं म्हटलं आणि त्याक्षणी बाळासाहेबांनी सभा जिंकली. बाळासाहेबांच्या या वाक्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.
 
आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारण हे ‘गजकरणासारखं’ आहे. असं म्हणत बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनेचे धोरण स्पष्ट केले होते.
 
मात्र असं म्हटल्याचा एक फायदा असा झाला की राजकारणापासून दूर राहू इच्छिणाऱ्या मात्र सामाजिक क्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांनी समाजसेवेसाठी शिवसेनेचा पर्याय निवडल्याचं जाहीर केल्यानंतर बाळासाहेबांची दूरदृष्टी लक्षात आली.

मराठी माणसासाठी पहिला मेळावा ठरला खास
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आजही मराठी माणसं लक्षात ठेवतात यामागे अनेक कारणं आहेत. या पहिल्या मेळाव्यात मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणा-या शिवसेनेने आपली भुमिका अधिक स्पष्ट केली होती.
 
महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत मराठी माणसाला 80 टक्के जागा मिळाल्या पाहिजेत आणि मराठी लिहिता-वाचता किंवा चांगले मराठी बोलता येते अशा व्यक्तीलाच राज्य सरकारने सरकारी नोकऱ्या द्याव्यात अशी बाळासाहेबांनी मागणी केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यात, घराघरात शिवसेनेचे कार्यकर्ते घडू लागले.
 
त्यानंतरही बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला.अशारितीने शिवसेनेचा पहिला मेळावा, ज्याला गर्दी होईल का? हा प्रयत्न यशस्वी होईल का? अशी शंका बाळासाहेबांना वाटत होती, त्या मेळाव्याने राजकीय इतिहासात एक नवी परंपरा सुरु केली.बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दरवर्षी दसरा मेळाव्याची परंपरा जपली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भंडारा: मुलाचा जीव घेणारा बिबट्या अटकेत? वनविभागाच्या दाव्यावर गावकऱ्यांचा संशय!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात; आमदारांनी एका महिन्याचा पगार केला दान

लश्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट चकमकीत ठार

"माही, हा प्रवास अविस्मरणीय होता!" – धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षीची काळजाला भिडणारी पोस्ट

महाराष्ट्रातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; चंद्रपूरमधील न्यायालयीन कामकाजही ठप्प

पुढील लेख
Show comments