Dharma Sangrah
✕

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष

Updated: बुधवार, 27 मे 2026 (10:51 IST)
 
गांधीजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. १९१२ मध्येच ते कॉंग्रेसचे सदस्य झाले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्यांमच्या मोर्चाला संघटित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. १९२८ मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या आंदोलनत ते जखमी झाले होते. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहातही ते सहभागी झाले होते. त्यांना अटक करून सहा महिन्यांसाठी त्यांना तुरूंगात पाठविण्यात आले. १९३५ मध्ये झालेल्या अटकेवेळी त्यांना अल्मोडा येथील तुरूंगात ठेवले होते. तिथे त्यांनी आत्मचरित्र लिहिले.
 
१९४२ च्या आंदोलनात ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना अहमदनगरच्या तुरूंगात ठेवण्यात आले. तेथून १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी नऊ वेळा तुरूंगवास भोगला.
 
स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या हंगामी सरकारमध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. २७ मे १९६४ ला त्यांचे निधन होईपर्यंत ते या पदावर होते. नेहरूंच्या कार्यकाळात लोकशाही मजबूत करणे, देश व घटनेतील धर्मनिरपेक्षता कायम करणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आदी कामे करण्यावर भर देण्यात आला.
 
त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. पंचशील तत्वेही त्यांनी मांडली. १९५४ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत तटस्थ राष्ट्रांचा गट बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments