Dharma Sangrah
✕

केरळसाठी कुर्बानी...

Updated: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (10:47 IST)
 
पण जशी आपण लोकांवर टिका करतो तशी त्यांच्या स्तुत्य कार्यामुळे स्तुतीही करता आली पाहिजे. जसे राजकारणात कुणी सत्रू नसतो तर केवळ विरोधक असतो. त्याचप्रमाणे समाजकारणातही कुणी शत्रू नसतो तर केवळ विरोधक असतो. सर्व विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. बकरी ईद आली की नेहमी सोशल मीडियावर एक टिकेचा सूर सुरु होतो तो असा की मुसलमान मातीची बकरि कापणार का? बकरी दान करणार का? असा सवाल टिंगल म्हणून उपस्थित केला जातो. हा सवाल जरी चुकीचा असला तरी याला स्वतःस पुरोगामी म्हणवून घेणारी लबाड मंडळी जबाबदार आहे. ही पुरोगामी मंडळी हिंदूचे सण आले की लगेच पर्यावरण आदि संदेश हिंदूंना देत राहतात. त्यातल्या काही बाबी खरोखर पाळल्या पाहिजेत या मताचा मी आहे. पण ही मंडळी इतर पंथियांच्या सणावर काहीच बोलत नाही. त्यातल्या वाईट प्रथांवर बोटे ठेवत नाही. म्हणून हिंदूंकडून चिडून असली चुकीची टिका होत राहते. 
 
तर सांगायचा मुद्दा असा की ईदला अशाप्रकारची टिका होत राहते. पण यावेळी पुण्यातील काही तरुणांनी खर्‍या अर्थाने ईद वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आपत्कालात आम्ही जात धर्म भेद विसरुन सहकार्य करतो. ही भारतीयत्वाची भावना या मुस्लिम तरुणांनी उजागर केली आहे. या वेळी बकरीची कुर्बानी न देता केरळच्या पूरग्रस्तांना मदतरुपी कुर्बानी देण्यात यावी असे आवाहन या तरुण मंडळींनी केले. या कल्पनेचा शिल्पकार आहे पैगंबर शेख. पैगंबर शेख हा तरुण माझा फेसबुक मित्र आहे. जसे अनेक मित्रांमध्ये असतात तसे बरेचसे वैचारिक भेद आमच्यात आहेत. ते असोत. केरळसाठी कुर्बानी ही कल्पनाच मुळातच भन्नाट... 
 
पैगंबर शेखने एका व्हिडिओच्या माध्यमातून आणि पोस्टच्या माध्यमातून त्यांनी केरळसाठी कुरबानीचे आवाहन केले. या उपक्रमात अनेक तरुण जोडले गेले. इम्रान शेख, फईम शेख, सैफ खान, मुवाज मुजावर, शकील शेख, जावेद, अमन या तरुणांनी पैगंबरांना अमूल्य साथ दिली आणि ही रक्कम २५,००० रुपये इतकी झाली. या आवाहनाचे फेसबुक पोस्ट्स इतक्या व्हायरल झाल्या की पाहता पाहता ही रक्कम ८०,००० च्या घरात गेली. सामान्य माणूस कशाप्रकारे समाजकार्य करु शकतो हे पौगंबर शेखने दाखवून दिले आहे. सर्वसामान्य माणूस मोठी क्रांती करु शकत नाही. कारण त्याला घर असतं, बायको असते आणि मूलही असतं. या दैनंदिन जीवनात तो इतका गुंतलेला असतो की तो फेसबुकवर चर्चा करण्यापलीकडे काहीही करु शकत नाही. पण पैगंबरांनी दाखवून दिलं आहे की एक फेसबुक पोस्ट क्रांती घडवू शकते.
 
#कुर्बानी_केरळसाठी या हॅशटॅगवर तुम्ही क्लिक केलंत तर तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकत नसाल तर किमान या तरुणांचे कौतुक केले पाहिजे. जेणेकरुन या तरुणांची पाठ थोपटली जाईल आणि पुढेही ह्यांना असे सत्कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. मुस्लिम तरुण आपल्या धार्मिक संकल्पनेच्या बाहेर पडून काहीतरी सामाजिक कार्य करत आहेत हे कौतुकास्पद आहे. एक सर्वसामान्य, नोकरी करणारा कुटुंबवत्सल तरुण असून पैगंबर शेख यांनी जे कार्य केले आहे त्या कार्याला प्रणाम.
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments