Marathi Biodata Maker
✕

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

Published: मंगळवार, 7 मे 2024 (12:09 IST)
नेहमी तर्क करणारा विचार धारदार चाकू समान आहे जो वापरणार्‍याच्या हातातून रक्त काढतोचं.
 
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
 
जे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.
 
चंद्र आपला प्रकाश संपूर्ण आकाशात पसरवतो परंतू कलंक स्वत:जवळ ठेवतो.
 
जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
 
जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.
 
फक्त प्रेमच वास्तविकता असते, ती केवळ भावना नसते. हे एक परम सत्य आहे जे सृष्टीच्या हृदयात राहतं.
 
मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
 
ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.
 
आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
 
थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
 
निर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.
 
विश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.
 
एखाद्या मुलाचे शिक्षण आपल्या ज्ञानापुरते मर्यादित ठेवू नका कारण त्याचा जन्म दुसर्‍या वेळी झाला आहे.
 
परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.
 
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
 
पात्रातील पाणी नेहमी चमकत असते आणि समुद्राचे पाणी नेहमीच गडद असते. लघु सत्याचे शब्द नेहमीच स्पष्ट असतात, महान सत्य मौन असतं.
 
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.
 
प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.
 
प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.
 
फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.
 
महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर की पेट्रोल स्कूटर कोणती स्कूटर सर्वाधिक बचत देते जाणून घ्या

मुंबई गुन्हे शाखा आणि बीएमसीची मोठी कारवाई अनेक क्लिनिकवर छापे १० बोगस डॉक्टरांना अटक

LIVE: महाराष्ट्र एफडीएची कारवाई कॅन्डेला फार्माची ३ गोदामे सील

नाशिकमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आमदार आसिफ शेख यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीसांना दिला

पुढील लेख
Show comments