मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2024 (12:00 IST)

Death Anniversary राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यदिन

Shahu Maharaj
महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिले, महात्मा फुलें पासून ते आंबेडकर, गाडगे महाराज, कर्मवीर असे अनेक. समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.
 
ते कर्ते सुधारक होते आपल्या राज्यातील फासेपारधी ,मातंग , गारूडी यांना त्यांनी आपल्या दरबारात नोकऱ्या दिल्या एवढे करून ते थांबले नाही तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.
 
एकदा पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून त्याच्या अनावरणासाठी ब्रिटनचा सम्राट प्रिन्स आॅफ वेल्सला निमंत्रित करून पुण्यात आणले व महाराजांच्या पुतळ्याला सम्राटाला मुजरा करण्यास भाग पाडले असा हा पराक्रमी आणि मत्सुद्दी राजा होता. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. धनगर मराठा विवाह घडवून आपली उक्ती आणी कृती एकच आहे हे समाजाला दाखवून दिले.
 
ते कलासक्त होते आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत. एकदा नाटक पहातांना शिवाजी महारांजांच्या भूमिका करणाऱ्या तरूणाला त्यांनी लवून मुजरा केला. ते कुस्त्यांचे चाहते होते आजही कोल्हापूरात उत्तम मल्ल तयार होतात ती महाराजांनी दिलेली देणगी आहे.
 
राज्यातील शेतकरी शेतमजूरांची ते काळजी घेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्माण केली. त्यांनी विधवेच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहान दिले . कुलकर्ण्यांची वतने रद्द केली. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारा हा पहिला राजा भारतातील राजा होता. आजही महाराजांच्या कार्याचा अलौकीक ठसा  कोल्हापूर परिसरात दिसून येतो. महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींचे वारसदार होते. एकदा जंगलात अस्वल त्यांच्या अंगावर आले असतांना त्यांनी त्याचा सक्षमपणे मुकाबला केला होते. 
 
एकदा व्हाईसरायने संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी देशातील सर्व संस्थानिकांना निमंत्रीत केले होते. त्यामध्ये महाराज आपल्या शरीरयष्टीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचासारखा पराक्रमी प्रजेचे हीत पहाणारा साहित्य कला संस्कृतीची पाठराखण करणारा. समाजवादी समाजरचनेचा स्विकार करणारा राजा होणे नाही.
 
छत्रपती शाहू महाराज महत्वाचे कार्य
1902 साली शाहू महाराजांनी “पाटबंधारे धोरण”घोषीत केले.
26जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवगीय लोकांसाठी 50  टक्के जागा राखीव / आरक्षीत ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा ‘करवीर गैजेट” मधुन प्रकाशित करण्यात आला होता.
1905 साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामें जप्त केली व छात्र जगतगुरुचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्या “सदाशिव बेनाडीकर” यांची पीठाचे प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आली.
तसेच संस्थान मध्ये निरनिराळ्या जातीचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता “पुरोहीत शाळा” निर्माण केल्या.
1906 मध्ये शाहु महाराजांनी “छत्रपती शाहू स्पिनींग व जिनींग मिल” स्थापन केली. (2003  मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली आहे)  1906 साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानात “रात्रशाळा” सुरु केल्या. तर 1907 साली शाहु महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
1907  साली कोल्हापुरच्या पश्चिमेस 55 किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई” हे नाव देण्यात आले. या धरणाचे काम सबनीस या इंजिनीअर कडुन करुन घेण्यात आले. याच धरणाशेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर “राधानगरी” हे गाव बसविण्यात आले.
1908 साली शाहु महाराजांनी अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.
20  मे 1911  रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत विद्याथ्यांना 15 टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.
प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय
1911 साली शाहु महाराजानी शिंपी समाजाच्या मुलांसाठी “नामदेव वस्तीगृह”सुरु केले.
 
शेतकरी,कारागीर,कलाकार,विद्यार्थी गोर गरीब यांची ते काळजी घेत शेवटी दि.6 मे 1922  रोजी त्यांच निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन..!