Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सज्ज झालो आम्ही..नववर्षाच्या स्वागतासाठी..

Updated: सोमवार, 30 डिसेंबर 2019 (15:26 IST)
 
लहानपणापासून आतापर्यंतचा जीवनप्रवास पाहत असताना किंबहुना त्याचे सिंहावलोकन करीत असताना प्रत्येक वर्षी आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विलक्षण उत्साह दाखविला होता हे ध्यानात येईल. परंतु वर्षामागून वर्षे पाठीमागे पडत असताना येणार्‍या प्रत्येक नवीन वर्षात आपण आपल्या ध्येयाजवळ पोहोचण्यासाठी कोणते प्रयत्न केलेत याचेही स्मरण निश्चित होईल. 
 
केवळ आणि केवळ काही तरी संकल्प सोडण्यासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो हे खूळ डोक्यातून आधी काढून टाकायला हवे आणि अत्यंत मोकळेपणे नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे. कोणत्याही चांगल्या कामासाठी मुहूर्तापेक्षा आत्मविश्वास आवश्यक असतो. म्हणूनच वाचनाचा, पहाटे लवकर उठण्याचा, नवाउद्योग सुरु करण्याचा, व्यसन सोडण्याचा संकल्प करता यावा म्हणून कोणत्याही नवीन वर्षाचा पहिला दिवस कधीही नसतो. ईच्छाशक्ती अंगी असली की रोज उजाडणारा दिवसही वरील गोष्टींपासून दूर राहण्याचा संकल्प सोडण्यासाठी महत्त्वाचाच असतो. मागील वर्षीच्या पहिल्या दिवशी आपण काय संकल्प सोडला होता, आणि तो आतापर्यंत आपण पाळला का याचे चिंतन सुरु केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की नवीन वर्षाचे स्वागत संकल्प सोडण्यापेक्षा त्या दिशेने ठोसपणे कृती करण्यासाठी असणे आवश्यक असतो. याहीवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वचजण सज्ज असतील यात दुमत नाही. येणारे नवीन वर्ष या देशाला महासत्तेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणारे ठरावे या विचारानेच त्याचे स्वागत प्रत्येकाने करायला हवे आहे. पार्ट्या करून मावळत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी करण्याआधी आयुष्यातील उत्साह मावळू नये यासाठी आपण काय केले याचाही विचार एकदा पार्ट्या करणार्‍यांनी करायला हवा आहे.
 
आपण 2020 मध्ये पदार्पण करीत आहोत. 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल, असे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. विशेष म्हणजे हे स्वप्न तरुणांच्याच जीवावर त्यांनी पाहिले होते. डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी राष्ट्रासाठी आपण कोणते योगदान दिले याचाही विचार करायला लावणारे हे वर्ष आहे असे म्हणावे लागेल. आतापर्यंत झाले नाही, परंतु येणार्‍या वर्षापासून तरी आपण असे योगदान देण्याचा प्रयत्न करू, आणि डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी नव्या जोमाने, उत्साहाने, उमेदीने नवीन वर्षाचे स्वागत करू हा दृष्टिकोन तरुणाईने समोर ठेवायला काहीच हरकत नाही.
 
सचिन वायकुळे  

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

ऑनियन एक्सप्रेस' नाशिकहून ८०० टन कांदा घेऊन चेन्नईकडे रवाना

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासोबत एका मोठ्या कराराची घोषणा केली, तेलाचा मोठा साठा मिळाला

मुंबई विमानतळावर सुनेत्रा पवार यांनी अमित शहांना राखी बांधली

LIVE: रविवारी मुंबई लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनवर परिणाम, अनेक मार्गांवर मेगा ब्लॉक

हॅपी रक्षाबंधन ताई' आई बाबांना सांभाळ स्टेटस पोस्ट करत ११वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

पुढील लेख
Show comments