Marathi Biodata Maker

एक वर्क फ्रॉम होम (WFH) बाबा

Updated: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (13:37 IST)
 
दुसरी जबाबदारी आली माझ्यावर ती म्हणजे दूध, वाण्याकडे जाणे आणि भाजी फळे आणणे. ह्यात ही किती तरी भर पडली ज्ञानात. तर भोपळा अर्धा असे लिहिले असताना त्यातला किलो हा हिडन असतो. फरसबी आणि चवळी जरी एका कुटुंबातल्या असल्या तरी त्यांची आपल्या घरातली महती वेगळी आहे. हिला माझ्यापेक्षा भाजीवाल्यावर जास्त विश्वास आहे कारण त्याला आपल्या घरातल्या आवडी निवडी आणि भाज्यांचे प्रमाण माहीत आहे. भाजीवाल्याची कमाल वाटली त्याला त्याच्या बायकोसोबत किती तरी बायकांचं टेरर आहे. वाण्याकडच्या यादीतले आलेले सामान सॅनिटायझ करून झाल्यावर प्रश्नावलीला सुरवात होते. 
 
व्हील कशावर फुकट मिळाले??? म्हटले तू लिहिले होते.....छेsss मी विम लिहिले होते. बरं उद्या देतो त्याला परत. नाही नाही ठीक आहे चालेल कपडे धुईन त्यांनी मी.....सलमान जाहिरात करतो वापरून बघू....वाह रे सल्लू मियाँ आज तुने बचाया. गेले काही दिवस नियमाने झाडाला पाणी दिले म्हणून छान बहरली आहेत तर कळले पुरुषांनी झाडांची काळजी घेतली की बरोब्बर त्यांना वेगळी आभा येते. का आणि कसे हे विचारले असते तर विज्ञान, मनोविज्ञान आणि अध्यात्म ह्याची सांगड घातलेले वेगळेच उत्तर माझ्या दिशने आले असते. म्हणून सावध होतो मी......
 
गेले दहा मिनिट मुलगा आणि त्याची आई ह्यांच्यातले वाद अकराव्या मिनिटाला संपतात आणि पंधराव्या मिनिटाला "बोलू नको माझ्याशी" असे काही ऐकू येते (केवढा मोठ्ठा उलगडा आहे हा....). म्हणून पुढच्या एका वादाच्या क्षणी मी मध्यस्ती केली तर सौं नी चक्क माझी बाजू घेत आमच्या चिरंजीवांना समज दिली "समोरचा एवढा समजूत घालतोय ऐक ना जरा". मी दचकलो पूर्वीचे ठीक आहे गेला पूर्ण महिना २४*७ ह्यांच्या बरोब्बर असून ही मी "समोरचा"......हे एक वेगळे राजकारण नाही ना आणि मी बळी तर नाही कारण लॉक डाउन सुरू आहे, कार ची बॅटरी उतरलीये आणि हॉटेल पण बंद आहेत. मी ही आवाज बंद केला.......
 
ह्या सगळ्या गतिविधी साध्या नसून ह्या मागचा हेतू लक्षात घ्यायला सुरुवात केली. तर हा काळ जसा सेमिनार आणि वेबिनारचा आहे तसा हा आपल्या घरातला होमिनार आहे. ठरवून कधीही किचनमध्ये नसतो गेलो मी पण आता अगदी सहज वावरतोय. तू राहू दे असे म्हणणारी ही भार्या का बरे कर तू म्हणत असेल ???? तर उद्या मी नसले तर काय कराल ही वेगळी आशंका हिला वाटत असेल.....ह्या बापड्या ला घरातले ज्ञान हवे म्हणून ही राजकारण खेळते. मला बघून अपत्य ही घरकामात रस घेईल ही भाबडी आशा असावी. एकदाही कंटाळा आला घरात असे वाक्य ऐकले नाही मी उलट चौकस बघण्यासाठी हिला काय चार अतिरिक्त डोळे आले का काय असे वाटते......शेवटी काय तर ज्या घरासाठी सगळी तडफड सुरू असते तिथे सतत राहायला मिळणे पण भाग्यच....
फॅमिली टाइम म्हणतात तो हा आहे.....आज वाटले तुझ्या कार्यक्षेत्रात मला सहभागी करून घेतलेस आणि करीन त्याला संमती दिली....कोरोना तुझ्यामुळे खूप काही जमलंय ना !!!!!!!

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments