Dharma Sangrah

एकमेकांभोवती फिरणार्‍या लघुग्रहांचा शोध

गुरूवार, 19 जुलै 2018 (12:42 IST)
'नासा'ने दोन अशा लघुग्रहांचाशोध लावला आहे, जे एकमेकांभोवती फिरत असतात. प्रत्येकी 900 मीटर आकार असलेले हे लघुग्रह एकच असावेत, असे आधी संशोधकांना वाटले होते. मात्र, आता जगातील सर्वात मोठ्या अशा तीन रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने याबाबतचे निरीक्षण करण्यात आले आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मोरोक्को ऑकेमेडेन स्काय सर्व्हेकडून याबाबतचे निरीक्षण करून त्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यावेळी हा एकच लघुग्रह असावा, असे वाटले होते व या लघुग्रहाला '2017 वायई 5' असे नाव देण्यात आले. जूनपर्यंत या लघुग्रहाबाबत अधिक माहिती मिळालेली नव्हती. मात्र, आता एकसारख्या आकाराच्या दोन खगोलांचा हा लघुग्रह असल्याचे ताज्या संशोधनातून पुढे आले आहे. त्यांच तुलनेने सुस्पष्ट अशा प्रतिमाही टिपण्यात आल्या आहेत. गेल्या 21 जूनला या दोन्ही खगोलांनी मिळून बनलेला हा लघुग्रह पृथ्वीच्या आतापर्यंतच्या काळातील सर्वात कमी अंतरापर्यंत आला होता. आता आगामी किमान 170 वर्षे तो इतका जवळ येण्याची शक्यता नाही. जूनमध्ये तो पृथ्वीपासून 60 लाख किलोमीटरच्या अंतरावर होता.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पावसाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांचा 'रेड अलर्ट' जारी, मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग' सारखी कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंक्स आणि हानिकारक खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

LIVE: उद्धव ठाकरेगटातील उपनेत्या शुभांगी पाटील हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील होणार

सरखेल कान्होजी आंग्रे मराठा आरमाराचे प्रमुख आणि भारतीय नौदलाचे आद्य जनक यांची संपूर्ण माहिती व इतिहास

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का! उपनेत्या शुभांगी पाटील हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील होणार

पुढील लेख
Show comments