मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जून 2019 (10:15 IST)

international yoga day: सुंदर काया आणि ग्लोविंग स्किनसाठी करा त्रिकोणासन

त्रिकोणासन : रक्त प्रवाह सुधारतो. ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध होतो. हे आसन बद्धकोष्ठतेवर फायदेशीर ठरते. प्रेग्रन्सीतही रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी हे आसन करू शकता.
 
त्रिकोणासन कसे करावे
सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये साधारपणे साडेतीन ते चार फुट अंतर ठेवा.
उजवे पाऊल ९० अंशामध्ये तर डावे पाऊल १५ अंशामध्ये उजवीकडे फिरवा.
तुमच्या उजव्या पायाची टाच आणि डाव्या पायाचा कमानी भाग एका रेषेत असुद्या.
दोन्ही पावलांची पकड जमिनीवर घट्ट आहे याची खात्री करून घ्या.
आणि शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान आहे नां, लक्ष द्या.
एक दिर्घ श्वास आत घेऊन, श्वास सोडत सोडत कंबर सरळ ठेवत उजवीकडे झुकताना दोन्ही हात सरळ एका रेषेत ठेवा, उजवा हात जमिनीकडे तर डावा हात हवेत येऊ द्या.
कंबरेत न वाकता सहजासहजी शक्य होईल अशा रीतीने उजवा हात उजव्या पायाच्या नडगीवर, घोट्यावर किंवा जमिनीवर पाया जवळ टेकवा. डावा हात खांद्यातून सरळ ठेवत छताकडे ताणा. डोके सरळ किंवा डावीकडे वळवा, नजर डाव्या हाताच्या तळव्याकडे.
तुमचे शरीर पुढे किंवा मागे न झुकता बाजूला झुकले आहे याची खात्री करून घ्या. ओटीपोट आणि छाती पूर्ण उघडली आहेत नां.
शरीर स्थिर ठेवून थोडासा आणखी थोडासा ताण वाढवा. दिर्घ श्वसन सुरु ठेवा. प्रत्येक श्वासाबरोबर शरीराला आणखी विश्राम द्या. आपले लक्ष शरीर आणि श्वासावरच असू द्या.
श्वास आत घेत उभे रहा. दोन्ही हात शरीरा जवळ आणा, पाय सरळ एकत्र करा.
याच कृतीने डाव्या बाजूने हे आसन करा.
 
त्रिकोणासना चे ५ लाभ  
पाय, गुडघे, घोटे, हात आणि छाती यामध्ये बळकटी येते.
कंबर, माकड हाड, मांडीचे सांधे आणि स्नायू, खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतात आणि खुलतात.
मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो.
पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
अकारण भीती आणि ताण-तणाव कमी होतात. सायटिका, पाठदुखी कमी होते.