महावीरासन करा आणि कंबर सडपातळ ठेवा

mahaveer aasan
Last Modified बुधवार, 10 एप्रिल 2019 (15:54 IST)
दंडस्थितीतील एक आसन आहे. या आसनात शरीराची अवस्था वीर हनुमानाप्रमाणे होते म्हणूनच याला महावीरासन म्हटले आहे. हे करायला अतिशय सोपे आहे. प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, भरपूर श्‍वास घ्यावा, मग श्‍वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. साधारण अंदाजे तीन फूट पुढे नेला तरी चालेल. मग दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत न्यावेत, जणुकाही फार मोठे वजन उचलत आहोत अशी अवस्था हातांची करावी. हे आसन एकदा डावा पाय पुढे घेऊन करावे व एकदा उजवा पाय पुढे घेऊन करावे. आसन सोडताना सावकाश श्‍वास सोडावा, हळूहळू पुढे घेतलेला पाय माघे घ्यावा.
जर हे आसन भरभर केले तर त्याचा फायदा अधिक होईल. पाय पुढे मागे उजवीकडून आणि डावीकडृून जलद करावे. या आसनाचे फायदे अनेक आहेत. या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हात पाय बळकट होतात. पोट साफ आणि हलके होते. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनते. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक बनतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आपली प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावे. स्त्रियांनीसुद्धा हे आसन नियमित करावे. यामुळे पोटाचे विकार बरे होते. मासिक पाळीतील आरोग्य सुधारते. हाता-पायातील रक्‍ताभिसरण चांगल्याप्रकारे होऊन हाता-पायांची हाडे मजबूत होतात. या आसनाचा कालावधी हवा तेवढा ठेवता येतो. कारण हे करायला सोपे आसन आहे.
हाताच्या पंजांच्या मुठी आवळल्यामुळे बोटांचे कार्य सुधारते. तेथील स्नायू आणि हाडांना बळकटी येते. आसनस्थिती घेतल्यानंतर श्‍वास घेऊ नये आणि सोडूही नये म्हणजेच श्‍वास रोखून कुंभक करावे. आसन सोडताना श्‍वास सोडत नेहमीचे संथ श्‍वसन करावे. हे आसन करताना मागचा पाय थोडासा उचलला जातो. या आसनामुळे पुरुषांची संभोगशक्‍ती वाढते, स्त्रियांचा योनीमार्ग खुला होतो तसेच ज्या स्त्रियांची मासिक पाळी काही कारणामुळे वयात असताना बंद झाली असेल त्यांची मासिक पाळी या आसनामुळे सुरु होते. हे आसन नियमित केले असता बुटक्‍या लोकांची उंची वाढण्यास मदत होते.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज
कोणत्याही देशासाठी ऊर्जा महत्त्वाची गरज आहे. देशाचा विकास ऊर्जेच्या नियोजनावर अवलंबून ...

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे
असे म्हणतात की लहानपणी शिकलेल्या गोष्टी, ऐकलेले सगळे आपले व्यक्तित्व घडवतात. बालपणी ...

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!
जेव्हा आपण एखाद्या ब्रोकन हार्ट संबंधी विचार करतो तेव्हा आपण कदाचित त्याबद्दल वास्तविक ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...