शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

यामुळे तुटतात नाती, आपण तर करत नाहीये या चुका

नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. नाती मजबूत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज भासते. असाच रिलेशनशिपमध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. आपल्या ही काही चुकांमुळे नाती तुटत असतील तर वेळ आहे आपल्या चुका सुधारण्याची.
 
* आपल्या पार्टनरला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. जसे प्रत्येक गोष्टीत त्याला टोचून बोलणे, त्याकडून नेहमी आर्थिक मदत मागणे.
 
* खोटे बोलणे, धोका देणे, ईर्ष्या, आणि अपमान हे सर्व एका अस्वस्थ नातं असल्याचे संकेत आहे. याने साथीदाराला हर्ट करणे किंवा त्यावर आपला वर्चस्व गाजवण्यासारखे आहे.
 
* आपला पार्टनर एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत असल्यास त्याला दोषी ठरवण्याआधी त्यामागे आपणच तर कारणीभूत नाही हा विचार करणे देखील गरजेचे आहे.
 
* परवानगी घेतल्याविना आपल्या पार्टनरचा फोन किंवा ई-मेल बघणे वादाचे कारण होऊ शकतं, याने आपलं नातं धोक्यात पडू शकतं कारण लहान-लहान गोष्टी कधीही दुरावा निर्माण करू शकतात.