मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

आपला पार्टनर धोका तर देत नाहीये, हे 5 संकेत करतील इशारा

नाती नाजुक असतात, त्यांना सांभाळण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे आपसात दुरी येते. नाती मजबूत ठेवण्यासाठी त्याची काळजी तसंच नजर ठेवण्याची देखील गरज असते. गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपला पार्टनर आपल्याला धोक्यात ठेवू शकतो. आता आपण विचार करत असाल की असंच घडतं असेल तर ओळखाच तरी कसं. जाणून घ्या 5 संकेत ज्याने कळून येतं की पार्टनर आपल्याला चीट तर करत नाहीये न? 
 
बोलण्याचा अंदाज
काही दिवसांपासून पार्टनर आपल्या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे देत नाहीये किंवा काही विचारल्यास विचित्र उत्तर किंवा गोष्ट बदलणे असे करत असेल तर लक्ष द्या.
 
जवळ येत नाही
आधी एकमेकांच्या जवळ येण्यासाठी आतुर असणारा पार्टनर अचानक आपल्यापासून लांब राहणं पसंत करत असेल किंवा नेहमी पुढाकार आपल्याकडूनच होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. अनेकदा आपण जवळ गेल्यावर तो तिथून लांब होत असेल तरी शक्यता नाकारता येणार नाही.
 
नवीन मित्र
आपला पार्टनर आपल्या नवीन मित्र-मैत्रिणींबद्दल बोलत असेल किंवा मोबाइलवर त्याच्यासोबत तासोंतास गप्पा सुरू असतील किंवा आपली समोरच्याशी तुलना करत असेल तर गडबड असू शकते.
 
स्वभावात बदल
स्वभावात खूप बदल आला असल्यास जसं आधी खूप गप्पा मारत असणार्‍यांनी गप्प राहणे किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींवर अधिक लक्ष देणे. विचित्र वागणूक असणे किंवा सांगितल्याविना बाहेर जाणे किंवा बाहेर जाण्यासाठी बहाणे मारणे.
 
फोनवर अधिक वेळ घालवणे 
हल्ली सगळेच फोनवर अधिक वेळ घालवतात तरी आपल्याशी लपून इतर कोणाला मेसेज करणे, फोनवर गप्पा मारणे आणि नंतर डिटेल डिलीट करणे किंवा विचारल्यावर प्रमाणित उत्तर न देणे हे धोक्याचे संकेत आहे. 
 
असं सगळं घटत असेल तर समजून घ्या की सर्व काही व्यवस्थित नाही. आपल्या नात्याला वेळ देण्याची आणि स्पष्टीकरण मागण्याची वेळ आली आहे.