शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

प्रेम... जरा जपून सांभाळा नाती

प्रेमात सावध राहण्याची गरज आहे. आपणही रिलेशनमध्ये असाल किंवा प्रेमात पडण्याचा विचार असेल तर त्या तीन चुकांबद्दल जाणून घ्या ज्या करणे टाळाव्या. कारण या चुकांमुळे प्रेमाचा कडू अनुभव चाखावा लागतो आणि अनेकदा रिलेशन पुढे वाढण्यापूर्वीच तुटून जातात. 
 
घाई
प्रेमात घाई करणे टाळा. सर्वात आधी समोरच्याशी आपली केमेस्ट्री जुळत आहे की नाही हे बघून घ्या. आपण किती वेळ एकमेकासोबत घालवत आहात किंवा समोरच्याने याबद्दल विचार केला आहे का, या सर्व गोष्टी आधीपासून स्पष्ट असाव्या. अनेकदा घाईघाईत प्रपोज केल्यामुळे रिलेशन सुरू तर होऊन जातं पण नंतर कळतं की समोरच्या यात अधिक रस नाही. किंवा चांगली मैत्री आहे म्हणून प्रेम टिकेल असे देखील म्हणणे योग्य ठरणार नाही. म्हणून घाई करू नये आणि दोघांना जोपर्यंत एक सारखी फिलिंग नसेल तो पर्यंत पुढे वाढण्यात अर्थ नाही. योग्य वेळेची वाट बघणे अधिक योग्य ठरेल.
 
भावना व्यक्त करणे
रिलेशन सुरू झाल्यावर देखील लगेच पुढची पायरी चढणे योग्य नाही. एकमेकांशी कंर्फटेबल होत नाही तो पर्यंत अती भावुक होऊन इंटिमेट होण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या या पाउलामुळे आपल्या कॅरेक्टरवर प्रश्न उभे राहू शकतात. त्यामुळे समोरच्याची इच्छेचा सन्मान करत पुढे वाढावे. आधी विचार जाणून घेणे आणि त्यानंतर पाऊल उचलणे योग्य ठरेल.
 
हक्क बजावणे
रिलेशनमध्ये आल्यावर हक्क बजावणे ही सर्वात मोठी चूक समोर येते. समोरचा पूर्णपणे आपली प्रॉपर्टी नाही असे विसरून चालणार नाही. पझेसिव्ह असणे आणि हक्क बजावणे वेगळ्या गोष्टी आहे. आपल्यामुळे समोरचा हर्ट तर होत नाही यांची काळजी तर घेतलीच पाहिजे.