Marathi Biodata Maker
✕

सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना...

Updated: गुरूवार, 2 जुलै 2020 (13:07 IST)
 
अधिकृत सर्व्हिस सेंटर : सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाइल दुरुस्ती ही अधिकृत सर्व्हिस सेंटरवर करावी. काही सर्व्हिस सेंटरवर खोट्या पाट्या लावलेल्या असतात. सर्व्हिस सेंटर भासवण्यासाठीनल केली जाते. मोठमोठ्या बाजारपेठेत लोकल सर्व्हिस सेंटरचे अधिकृत दुरुस्ती केंद्र असल्याचे बोर्ड लावतात. म्हणून याची खातरजमा
करण्यासाठी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून सेंटरचा पत्ता घ्यावा. याशिवाय संकेतस्थळावरही सर्व्हिस सेंटरवर मोबाइल देताना...
 
आपल्याला अधिकृत सेंटरची माहिती मिळवू शकते.
डेटा बॅकअपः सर्व्हिस सेंटरवर मोबाइल जमा करण्यापूर्वी फोनमधील उपलब्ध एक-एक फोटो, नंबर आणि अन्य गोष्टींचा बॅकअप घ्या. हा बॅकअप आपण दुसरा फोन, लॅपटॉप, हाडॅडिस्क, मेमरी कार्ड किंवा गुगल ड्राइव्हवर किंवा मोबाइल कंपनीच्या क्लाऊडवर घेऊ शकता. कारण सर्व्हिस सेंटरकडून आपला खासगी डेटा सार्वजनिक होऊ शकतो, त्याचबरोबर डिलिटही होऊ शकतो.
 
सिमकार्ड, मेमरी कार्ड, बॅटरी काढून घ्याः सर्व्हिस सेंटरवर अनेकदा घाईगडबडीत सिमकार्ड आणि मेमरी कार्ड ठेवतो. परंतु ही बाब चुकीची आहे. जोपर्यंत बॅटरीचा प्रश्न आहे, आजकाल नॉन रिमूव्हबेल बॅटरी येत आहेत. सर्व्हिस सेंटरवर सिमकार्ड ठेवण्याचा अर्थ म्हणजे तिजोरीची चावी देण्यासारखेच आहे. पे बिल घ्याः सर्व्हिस सेंटर अनेकदासॉफ्टवेअर अपडेट करतात. स्पेअर पार्टस्‌ बदलण्याचे पैसे घेतात. अशात आपण पार्टस्‌ बदलण्याचे पे बिल मागा. त्याचबरोबर खराब होण्याच्या कारणाचा शोध घ्या.
 
लिस्ट तयार कराः अनेकदा फोनमध्ये अनेकप्रकारच्या अडचणी येतात. मात्र सर्व्हिस सेंटरवर गेल्यानंतर आपण काही बाबी सांगण्याचे विसरून जातो. यासाठी मोबाइलसंदर्भात असलेल्या तक्रारीची घरातच यादी तयार करावी आणि ती सर्व्हिस सेंटरवर मांडावी. जेणेकरून एखादी गोष्ट विसरली जाणार नाही 
महेश कोळी

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: पोलीस दलांचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ

पुणे महापौरांचे रोहित पवार यांना' पुणे बंद'ची धमकी दिल्यानंतर उघड आव्हान

उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सर्व आठ राज्यसभा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि का साजरा केला जातो इतिहास जाणून घ्या

पोलीस दलांचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ प्रमुख निर्णय

पुढील लेख
Show comments