Marathi Biodata Maker
✕

World Population Day 2026 विश्व जनसंख्या दिवस का साजरा केला जातो? इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या

Updated: शनिवार, 11 जुलै 2026 (10:16 IST)
 
विश्व जनसंख्या दिवस २०२६ थीम
संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी या दिवसासाठी एक विशेष थीम ठरवली जाते. २०२६ या वर्षाची अधिकृत संकल्पना खालीलप्रमाणे आहे:
"तरुणांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे – आज आणि भविष्यासाठी." 
(Realizing the hopes and aspirations of young people – today and for the future)
 
या संकल्पनेचा मुख्य उद्देश: सध्या जगातील तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि अधिकारांमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण तरुणांना योग्य संधी दिल्या, तर ते भविष्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला योग्य दिशा देऊ शकतील, यावर यंदा विशेष भर देण्यात आला आहे.
 
या दिवसाचे महत्त्व काय आहे?
वाढती लोकसंख्या ही केवळ एक 'संख्या' नसून तिचा थेट संबंध मानवी जीवन आणि निसर्गाशी आहे. या दिवसाचे महत्त्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते:

संसाधनांवर येणारा ताण: अन्न, पाणी, जमीन आणि ऊर्जा यांसारखी नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. लोकसंख्या ज्या वेगाने वाढते आहे, त्या प्रमाणात संसाधने वाढू शकत नाहीत. या असमतोलावर चर्चा करणे आणि उपाय शोधणे यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
 
आरोग्य आणि कुटुंब नियोजन: महिलांचे आरोग्य, सुरक्षित मातृत्व, आणि कुटुंब नियोजनाची साधने सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचवणे, हा या मोहिमेचा मोठा भाग आहे.
 
लैंगिक समानता : मुलींचे शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण केल्यास लोकसंख्या नियंत्रणात आणि समाज सुधारण्यात मोठी मदत होते, हा संदेश या दिनाद्वारे दिला जातो.
 
नियोजन आणि विकास: वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे होणारे नागरिकरण, बेरोजगारी, गरीबी आणि गरिबांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा यांवर जागतिक पातळीवर धोरणे आखण्यासाठी हा दिवस एक 'चेकपाँईंट' म्हणून काम करतो.
 
विश्व जनसंख्या दिवस- FAQs
१. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो?
दरवर्षी ११ जुलै रोजी.
 
२. जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कधी झाली?
हा दिवस १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे (UNDP) सुरू करण्यात आला.
 
३. जागतिक लोकसंख्या दिनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
लोकसंख्येसंबंधित आव्हानांवर उपाय शोधताना, प्रत्येक व्यक्तीच्या हक्क, आरोग्य आणि उत्तम जीवनाबद्दल जागरूकता निर्माण करणे.
 
४. जागतिक लोकसंख्या दिन का साजरा केला जातो?
कुटुंब नियोजन, लोकसंख्या, प्रजनन आरोग्य, शिक्षण आणि शाश्वत विकासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी.
 
५. जागतिक लोकसंख्या दिन २०२६ ची संकल्पना काय आहे?
"तरुणांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे – आज आणि भविष्यासाठी."

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: काँग्रेसने महाराष्ट्रातील नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकली

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; पीएम ग्राम स्वराज्य योजनेला मंजुरी, ७,००० कोटी रुपयांद्वारे २.५५ लाख पंचायती सक्षम होणार

नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला

LIVE: पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

अबू आझमी यांची तुकाराम मुंडे यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments