शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

बूट निवडताना...

जास्त घट्ट बूट घातल्याने पाय दुखणं, नखं वाढणं, नखं तुटणं यांसारख्या समस्या उद्भवतात. पायांचा आकार  बदलण्यासोबतच बोटांची हाडं वाकटी होऊ शकतात. 
 
* मिनिमॉलिस्ट बूटांमध्ये पायांच्या आधारासाठी टाचांपाशी फुगवटा नसतो. यामुळे पायांना जखम होऊ शकते. अशा बुटांमुळे स्नायू दुखावण्याची शक्यता वाढते. 
 
* हेवी ट्रेकर्स बुटांची ग्रिप चांगली असली तरी वजन जास्त असतं. वजनदार ट्रेकर्समुळे पाय दुखतात. पायांमध्ये थकव जाणवू शकतो. त्यामुळे कमी वजनाचे  बुट वापरायला हवेत. 
 
* अतिघट्ट बुटांमध्ये पायांच्या सांध्यांची हालचाल मोकळेपणाने होत नाही. यामुळे पाय दुखतात. 
 
* सपाट चप्पल किंवा बुटांमध्ये पायांना आधार मिळत नाही. सपाट पादत्राणं बराच काळपर्यंत घातल्यास पाठदुखी, गुडघेदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
* स्लीपर किंवा फ्लिपफ्लॉप चपलांमध्ये पाय उघडे रहात असल्याने जखम होण्याची शक्यता वाढते.  
 
* घट्ट किंवा छोट्या आकराच्या बुटांमुळे भेगा पडणं, सांध्यावर ताण येण्यासारख्या समस्या उद्भवतात.