Daily Horoscope
✕

मास्कचा फॅशन फंडा

Updated: गुरूवार, 16 जुलै 2020 (14:07 IST)
* सर्जिकल मास्क मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. हे मास्क कोणत्याही कपड्यांसोबत शोभून दिसतात. भारतीय तसंच पाश्चिमात्त्य पेहरावासोबत तुम्ही सर्जिकल मास्क कॅरी करा. त्यातही साडी, सलवार कमीझ अशा पारंपरिक भारतीय पेहरावांसोबत सर्जिकल मास्क शोभून दिसतात. भारतीय पेहराव केला असेल तर शक्यतो निळ्या रंगाचं मास्क लावा. वेस्टर्न वेअरवर पांढरं मास्क खुलून दिसेल.
* एन-95 मास्कही लोकप्रिय आहेत. यामुळे कोरोना विषाणूसह प्रदूषणापासूनही बचाव होतो. हे मास्क चंकीफंकी कपड्यांसोबत खुलून दिसतात. जॉगर्स, एक्सरसाईज पँट, शॉर्टस्‌, रिप्ड जीन्स, पुलओव्हर घातले असतील तर एन 95 मास्क लावा. या मास्कमुळेतुम्हाला कॅज्युअल लूक मिळेल.
* कॉटन प्रिंटेड मास्कही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रंगांचे, प्रिंट्‌सचे हे मास्क खूप छान दिसतात. भारतीय पेहरावासोबत कॉटन मास्क कॅरी करा. सारा अली खाननेही सलवार कमीझवर छानसं कॉटन मास्क घातलं होतं.
* तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं काळ्या रंगाचं मास्क असेल तर ते कॅज्युअल प्रसंगी वापरा. जीन्स, टी शर्ट, पलाझो, केप्रीवर ब्लॅक मास्क घालता येईल. निऑन रंगांच्या पेहरावासोबत ब्लॅक मास्क शोभून दिसेल. तुम्ही फुल ब्लॅक लूकही कॅरी करू शकता.
 श्रीशा वागळे

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यास काय होते? ‘ही’ लक्षणे दिसल्यास वेळीच ओळखा

शरीर सडपातळ आणि फिट ठेवण्यासाठी या ५ योगा टिप्स अवलंबवा

जातक कथा : दुष्काळ आणि कासवाची गोष्ट

नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळा असा प्रकार ''मसाला स्टफ्ड इडली'' Tiffin recipe

रिकाम्या पोटी हळदीचं पान खाण्याचे फायदे, डॉक्टरांनी सांगितलं पोटाचे सर्व त्रास निघून जातात!

पुढील लेख
Show comments