बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (08:39 IST)

Flax Seed For Hair : केसांसाठी जवसाचे 5 सर्वोत्तम फायदे

जवसाचे वापर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि सौंदर्यासाठी करतात. पण ही जवस आपल्या केसांना सुंदर आणि बळकट बनविण्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घेऊया केसांसाठी जवसाचे हे 5 फायदे.
 
1 व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेली जवस आपल्या केसांना पोषण देण्याच्या व्यतिरिक्त केसांची लांबी वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. ह्याचा तेलाचा वापर केसांच्या वाढीसाठी एक चांगला पर्याय आहे.
 
2 जवस किंवा ह्याचा तेलाचा वापर केसांच्या मुळांना पोषण देतं. ह्याचा सतत वापर केल्याने केसांची गुणवत्ता सुधारून सौंदर्य देण्यासाठी प्रभावी होऊ शकतं.
 
3 जवसच वापर करून आपण केसांना तुटण्यापासून, दोन तोंडी होण्यापासून आणि इतर अनेक समस्यांपासून वाचवू शकता. जर आपण रुक्ष आणि निर्जीव केसांच्या समस्यांपासून त्रस्त झाला असाल. तर जवस आपल्या केसांसाठी एक वरदान ठरेल.
 
4 केसांची वारंवार गळती होत असल्यास किंवा केसांमध्ये कोंडा झाला असल्यास, जवसाचे पॅक किंवा जवसाच्या तेलाचा वापर केल्याने आपल्याला केसांच्या या समस्येपासून सुटका मिळते.
 
5 जवस ओमेगा 3 फॅटी ऍसिडने समृद्ध असल्यामुळे केसांना निरोगी आणि बळकट बनवतं आणि केसांना लवचीक ठेवण्यास मदत करतं. याने केस तुटण्याची समस्या देखील  नाहीशी होते.