बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केसांना रेशमी आणि मऊ करण्यासाठी Banana Hair Pack

केळ्यांचा वापर बऱ्याच सौंदर्यवर्धक वस्तूंमध्ये केला जातो. चेहऱ्याला सतेज करविण्यासाठी असो किंवा आरोग्यासाठी असो. आज आपण केळ्या पासून हेअर पॅक कसे बनवता येईल हे जाणून घ्यू ज्याने केस मऊ चमकदार रेशमी करण्यास फायदेशीर ठरेल. घरी बनवल्यामुळे ह्यामध्ये कुठलेही केमिकल नसतात. या मुळे आपल्या केसांना काही ही इजा होत नाही. 
 
केसांसाठी फायदेशीर केळं : 
केळ्यांमध्ये आढळणारे सिलीका आपल्या शरीरात असलेल्या कॉलेजनला संश्लेषित होण्यासाठी साहाय्य करतात. या मुळे आपले केसं घनदाट होतात. या मध्ये आढळणारं अँटिमायक्रोबियल डोक्याची खाज आणि डेंड्रफ सारख्या समस्येचे नायनाट करते. घरच्या घरी केळ्यांची ही 3 हेअर पॅक बनवा ज्याला वापरण्याने आपले केसं मऊ आणि चमकदार होतात. चला तर मग जाणून घेऊ या कसे काय तयार करता येईल हे हेअर पॅक.
 
1 केळं आणि मोहरीचे तेल 
साहित्य : 1 केळं, 1 मोठा चमचा मोहरीचे तेल
कसे वापरायचे : केळ्याला कुस्करून घ्यावे. ह्यामध्ये काही थेंब मोहरीचे तेल टाकावे. आता या मिश्रणाला आपल्या केसांना लावून चोळावे. अर्धा तास ठेवून नंतर शॅम्पूने आपले केस धुऊन घ्यावे. लक्षात असू द्यावे की या मध्ये मोहरीच्या तेलाचा वापर जास्त करू नये. मोहरीचे तेल चिकट असल्याने केसांमधून व्यवस्थितरीत्या निघत नाही. 
उपयोग केल्याने होणारे लाभ : ह्याचा उपयोग केल्याने केसांचा रुक्षपणा दूर होऊन केसांची चमक वाढते.
 
2 केळं आणि अंडी 
साहित्य : 2 केळी, 1 अंडं, 1 चमचा नारळाचे तेल, 3 चमचे मध 
कसे वापरायचे : केळ्याला कुस्करून घ्यावे. यात अंडं, नारळाचे तेल आणि मध टाकून सर्व साहित्याला एकजीव करावे. ह्याला आपल्या केसांमध्ये लावावे. केसांना शॉवर कॅपने झाकावे. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुऊन टाकावे. 
उपयोग केल्याने होणारे लाभ : केस मजबूत आणि घनदाट होतात. 
 
3 केळं आणि मध
साहित्य : 2 केळी, 2 चमचे मध
कसे वापरायचे : केळ्याला कुस्करून घेणे. गाळणीने गाळल्यावर निघालेल्या पेस्ट मध्ये 2 चमचे मध टाका. ही पेस्ट केसांच्या मुळात लावा. अर्ध्या तासापर्यंत लावून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. 
उपयोग केल्याने होणारे लाभ : केसांना पोषकता मिळते. तसेच केसं गळणे कमी होते.