शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (09:43 IST)

नारळाच्या तेलात मिसळा या तीन वस्तू, लांब- दाट केस मिळवा

नारळाचं तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं, परंतु आपण आपल्या केसांच्या वाढीसाठी या खास गोष्टीसाठी नारळ तेलात मिसळून ह्याला अजून फायद्याचे बनवू शकतात. केसांच्या वाढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी मिसळू शकता.
 
प्रत्येक भारतीय कुटुंबाला असे वाटते की, नारळ तेल गुणांचा भंडार आहे आणि या मागे एक चांगले कारण असे आहे की नारळाचे तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या केसांच्या मुळात योग्य प्रकारे शिरतं आणि टाळू देखील निरोगी ठेवत. 
 
आता विचार करा की आपण आपल्या आठवड्याच्या मालिशापूर्वी नारळाच्या तेलामध्ये केसांच्या वाढीसाठी कोणती नैसर्गिक सामग्री घालू शकता, जी आपल्या केसांसाठी एक योग्य मिश्रण असेल. असे केल्यानं आपले केस खराब होण्यापासून वाचू शकतात, तसेच हे सुनिश्चित केले जाऊ शकते की आपले केस नेहमीच निरोगी आणि बळकट असावे.
 
निरोगी केसांच्या वाढीसाठी आपण नारळाच्या तेलात या तीन गोष्टी समाविष्ट करू शकतात.
 
1 नारळाचं तेल आणि कढी पत्ता - 
आपण स्वयंपाकघरात जा आणि मूठभर कढीपत्ता घ्या. स्वयंपाकघरातील ही सामान्य गोष्ट आपले केस वाढविण्यास मदत करू शकते. कढी पत्ता यात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात. जे केसांच्या वाढीस मदत करते.
 
यामधील असलेल्या पोषक घटकांमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट आणि अमिनो ऍसिड केसांना पातळ होण्यापासून रोखतात आणि केसांचे मूळ घट्ट होण्यास मदत करतात. यामुळे केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळते. 
 
आपल्याला एवढेच करावयाचे आहे की मूठभर कढीपत्ता घ्या आणि त्यांना काही दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्या. आता या वाळक्या पानांना 100 मिली. नारळाच्या तेलात उकळवून घ्या. या तेलाला थंड होऊ द्या, गाळून बाटलीत भरून घ्या. आता या तेलाने मालीश करा. 
 
2 नारळाचं तेल आणि काळा बियाणे -
आपण नायजेला बियाणे याबद्दल ऐकलं असेल, जे व्हिटॅमिन ए, बी, आणि सी ने समृद्ध असल्याचे सांगतिले जातं. ते मॅग्नेशियम, झिंक, लोह, पोटॅशियम आणि आवश्यक फॅटी ऍसिड सारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. आता हे शक्तिशाली घटकच आहे जे आपल्याला निरोगी केस देतात. जर का आपण केसांच्या गळण्या आणि तुटण्या सारख्या समस्यांशी झटत असाल, तर आपल्या केसांमध्ये नारळाचं तेल आणि कलौंजी च्या या गुणवर्धक अश्या या मिश्रणाला वापरून बघा. 
 
या साठी सर्वप्रथम एक मोठा चमचा बियाणे दळून घ्या आणि नारळाच्या तेलाच्या बाटलीत मिसळा. वापर करण्याच्या दोन ते तीन दिवस असेच ठेवा. लावण्याचा पूर्वी तेल कोमट करून मगच डोक्याची मॉलिश करा. 
 
3 नारळाचं तेल आणि जास्वंदाचं फुलं -
जास्वंदाचं फुलं आपल्या केसांना अनेक पटीने फायदेशीर असतात. ते केवळ केसांच्या निरोगी वाढीस प्रेरणाच देत नसून केसांच्या गळतीला देखील रोखतात. आणि केसांना लवकर पांढरे होऊ देत नाही. व्हिटॅमिन ए आणि सी ने समृद्ध, जेव्हा आपण जास्वंदाच्या फुलांना नारळाच्या तेलासह मिसळता तेव्हा हे तेल आपल्या केसांना कमकुवत होण्यापासून रोखत. जेणे करून केसांची गळती कमी होते.
 
मूठभर जास्वंदाची फुले घ्या, त्यांना थंड पाण्याने धुऊन घ्या आणि उन्हात वाळवून घ्या. एकदा कोरडे झाल्यावर नारळाचं तेल गरम करा आणि हळुवारपणे त्या फुलांच्या पाकळ्या या तेलात मिसळा. मंद आंचेवर मिश्रणाला गरम होऊ द्या. थंड करायला ठेवा. तेलाला बाटलीत काढून ठेवून द्या. आता एक दिवसाआड आपल्या टाळूला लावावं आणि किमान एक तास तरी केसांमध्ये तसेच ठेवा. नंतर केसांना धुऊन घ्या.