गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

केस गळती रोखेल कडीपत्ता आणि जास्वंद तेल

केसगळती ही जागतिक समस्या आहे. बरेच उपाय करूनही केसगळती काही कमी होत नाही. पण आपण कडीपत्ता आणि जास्वंदाच्या वापर तेलाच्या रूपाने केल्यास केस गळतीपासून काहीसा आराम मिळू शकतो. या साठी आपल्याला ह्याचे तेल बनवावे लागणार चला तर मग हे तेल कसे बनवायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊ या. 
 
साहित्य- 100 ग्रॅम नारळाचे तेल, 3- 4 चमचे एरंडेल तेल, 4 -5 जास्वंदाचे फुले, 3 मूठ कडीपत्ता, 3 चमचे तीळ, 3 चमचे मेथीदाणा, 1 वाटी किसलेला कांदा, किसलेला आवळा, आणि आलं.
 
कृती- सर्वप्रथम नारळाच्या तेलात कडीपत्ता, जास्वंदाची फुले, तीळ, मेथीचे दाणे, किसलेला कांदा, किसलेला आवळा, आलं घालून गॅस वर मंद आचेवर ठेवावे. गॅस मंदच असावा. नाहीतर तेल जळू शकते. सर्व रसांचा अर्क नारळाचा तेलात उतरल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवावे. हे आयुर्वेदिक तेल आठवड्यातून दोनदा लावल्याने केसगळतीच्या त्रासा पासून आराम मिळतो. आणि केसगळती थांबते. गरज असल्यास एरंडेल तेलसुद्धा टाकावे. अजून चांगले परिणाम मिळतात.