सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 15 जुलै 2023 (09:27 IST)

Hair Care : मजबूत केसांसाठी आहारात सामील करा या वस्तू

Hair Care :केसांच्या सुंदरतेसाठी आपण काय नाही करत.. स्पा, तेलाने मॉलिश आणि वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने देखील वापरात आहात. परंतु काही आहार आपल्या केसांच्या सौंदर्यतेला आणि बळकटीला परत मिळवून देऊ शकतात. ते ही  कुठल्याही प्रकाराचा त्रास न घेता. जाणून घेउया हे 5 आहार ज्यांचा सेवनाने आपल्या केसांच्या समस्यांचं निरसन होऊ शकतं.
 
1 गाजर : लाल गोड गाजर चवी बरोबरच आपल्याला चांगले आरोग्य आणि सौंदर्य देखील देतं. तसेच हे व्हिटॅमिन ए चे चांगले स्रोत आहे. त्याच बरोबर यामध्ये असलेले कॅरोटीन आपल्या केसांना आणि डोळ्यांना सुरक्षित आणि सुंदर ठेवतं. आपल्या केसांना मूळापासून हे बळकट करत.
 
2 पालक : पालक खाणं फायदेशीर असतं. आरोग्याबरोबरच हे आपल्या केसांच्या गळतीला ही थांबवत. यात मुबलक प्रमाणात आयरन (लोखंड) मुबलक आढळल्यामुळे केसांसाठी हे वरदान ठरतं. 
 
3 रताळे : ह्याला गोड बटाटा देखील म्हणतात. यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं. जे आपल्या केसांना बळकट करून केसांची गळती थांबवतं. आपल्या मुळांमध्ये आढळणारं तेल देखील सुरक्षित ठेवतं. जेणे करून आपल्या केसांना पोषण मिळतं.
 
4 दही : दही खाल्याने देखील केसांची गळती थांबते. केस सुंदर आणि चमकदार बनतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन डी आपल्या केसांना नवे चैतन्य आणि चांगले आयुष्य देतं.
 
5 बेदाणे : आपल्या केसांची वाढ होत नसल्यास काळजी करु नये. बेदाणे खाल्याने आपल्या केसांची जलद गतीने वाढ होते. यामध्ये आयरन( लोखंड) आणि मिनरल्स (खनिजे) मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या केसांना पोषण देतं.